मुंबई: Sanjay Raut: आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना क्लीनचिट मिळाली. यावर संजय राऊत प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्याचा 2024 मध्ये हिशोब केला जाईल असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी दिला आहे.
सरकार बदलल्यानंतर ज्या अनेक गोष्टी अपेक्षित असतात, त्यातली ही एक गोष्ट आहे. याचा अर्थ तो विषय संपलेला नाही. आयएनएससाठी पैसे गोळा झाल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. पैशांचा अपहार झालाच आहे. पैसे राजभवनात गेले असं म्हणतात आणि राजभवन म्हणतं पैसे आलेच नाहीत. हाच तर भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा पुरावा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.