Varsha Raut: पत्रा चाळ घोटाळ्यात संजय राऊत यांच्या पत्नीचा काय संबंध?, आज वर्षा राऊतांची ED चौकशी

गावगाडा
पूजा विचारे
Updated Aug 06, 2022 | 08:24 IST

Sanjay Raut News: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

Sanjay and varsha raut
संजय राऊत आणि वर्षा राऊत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • संजय राऊतांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
  • ईडीनं सांगितलं की, वर्षा यांच्या खात्यातील व्यवहार उघडकीस आल्यानंतर समन्स बजावण्यात आले आहेत.
  • ईडीने एप्रिलमध्ये वर्षा आणि संजय राऊत यांच्या दोन सहकाऱ्यांची 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती.

मुंबई: ED interrogation of Varsha Raut today: गोरेगाव (Goregaon)  येथील पत्रा चाळ घोटाळ्यात (Patra Chal scam)  शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut)  यांना ईडीकडून (Enforcement Directorate) 31 जुलै रोजी अटक करण्यात आली. राऊतांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान आता त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीनं नोटीस पाठवली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना चौकशीसाठी बोलावले आहे. पत्रा चाळ जमीन प्रकरणात ही चौकशी होणार आहे. या व्यवहाराची बाब समोर आल्यानंतर वर्षा राऊत यांनाही समन्स पाठवण्यात आले आहेत.

ईडीनं सांगितलं की, वर्षा यांच्या खात्यातील व्यवहार उघडकीस आल्यानंतर समन्स बजावण्यात आले आहेत. ईडीने एप्रिलमध्ये वर्षा आणि संजय राऊत यांच्या दोन सहकाऱ्यांची 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. यात प्रवीण राऊत यांची 9 कोटी रूपयांची मालमत्ता आणि वर्षा राऊत 2 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली होती. याप्रकरणी प्रवीण यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांचे अलिबागमध्ये आठ प्लॉट असून वर्षा राऊत यांच्या नावावर फ्लॅट नोंदणीकृत आहे, जो संलग्न करण्यात आला आहे.

अधिक वाचा- FTII च्या हाॅस्टेलमधून येत होती दुर्गंधी, खिडकीतून बघितलं तर...

वर्षा यांच्या बँक खात्यांची चौकशी

संजय राऊत प्रकरणात ईडीकडून अलिबागच्या जमिनीसाठी ज्या ज्या लोकांकडून रोख रक्कम घेण्यात आले आहेत त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. जे कथितरित्या म्हाडाच्या प्रकल्पाशी संबंधित एका विकासकाकडून पैसे देऊन खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात कोणी पैसे जमा केले त्यांचीही चौकशी केली जात आहे.

भांडुपच्या शाळेत शिक्षिका आहेत वर्षा

वर्षा राऊतचे 1993 मध्ये संजय राऊत यांच्यासोबत लग्न झाले होते. त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्या भांडुप येथील शाळेत शिक्षका आहेत.

याआधीही मिळाली आहे ईडीकडून नोटीस 

वर्षा राऊत यांना याआधी ही पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशीसाठी नोटीस पाठवली होती.

संजय राऊत ईडी कोठडीत 

कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 31 जुलै पहाटे अटक करण्यात आलेल्या राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांनी म्हणजेच 8 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी