Sanjay Raut यांना मिळणार जामीन? या दिवसापर्यंत ठेवला न्यायालयाने ठेवला निकाल राखून

Money Laundering Case: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत बुधवारी आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली. मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टाने हा आदेश दिला आहे. संजय राऊत यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. न्यायालय आता 9 नोव्हेंबरला निकाल देणार आहे.

Sanjay Raut will get bail? The court will deliver the verdict on November 9
Sanjay Raut यांना मिळणार जामीन? ९ नोव्हेंबरला न्यायालय देणार निकाल ।   |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बुधवारीही कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. यापूर्वी 21 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली होती. मुंबईतील पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत तुरुंगात आहेत. (Sanjay Raut will get bail? The court will deliver the verdict on November 9)

अधिक वाचा : Nashik: शिवशाही पेटली, नाशिकध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार; 45 प्रवासी बचावले

न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला असून, 9 नोव्हेंबर रोजी निकाल सुनावण्यात येणार आहे. खासदार संजय राऊत आज कोर्टात पोहोचले जिथे त्यांच्या जामीन अर्जावर ईडीची उलटतपासणी पूर्ण होणार आहे. त्यानंतर न्यायालय आपला आदेश देऊ शकते. या प्रकरणी ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये संजय राऊत यांना आरोपी करण्यात आले होते.

अधिक वाचा :आदित्य ठाकरे यांचा मराठवाडा दौरा करणार, नुकसान झालेल्या पिकांची करणार पाहणी

विशेष न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी फिर्यादीच्या तक्रारीची दखल घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांचे सहकारी प्रवीण राऊत यांच्यासह सर्व आरोपींना समन्स बजावले होते. त्याच्या वकिलाने म्हटले होते की, त्याला आरोपपत्राचा अभ्यास करून आपल्या याचिकेत अतिरिक्त कारणे जोडण्याचा निर्णय घ्यायचा आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्रा चाळच्या पुनर्विकासात आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी राऊतला ईडीने 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती. आता संजय राऊत यांचा रिमांड आणि जामीन दोन्ही एकत्र विलीन झाले आहेत.

अधिक वाचा : Eknath shinde : गड्या आपला गावच बरा.., सुट्टीवर आलेले मुख्यमंत्री शिंदे रमले शेत-शिवारात

संजय राऊतांच्या जामीन अर्जाला विरोध करताना ईडीने न्यायालयाला सांगितले होते की पत्रा चाळ पुनर्विकासातून मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी पडद्यामागे सर्व काम केले. ईडीने संजय राऊत यांचा दावा नाकारला होता की त्यांच्यावरील कारवाई द्वेषातून किंवा राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी