Sanjay Raut: भावाच्या अटकेनंतर आमदार सुनील राऊतांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले, ''आम्ही न्यायालयीन...''

गावगाडा
पूजा विचारे
Updated Aug 01, 2022 | 09:04 IST

Sanjay Raut's Arrest: राऊतांची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचं पथक आलं होतं. अधिकाऱ्यांची तीन पथकं त्यांच्या विरोधात तपास करत होते. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.

Sunil Raut
सुनील राऊत यांची पहिली प्रतिक्रिया  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • 1200 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात 17 तास झाडाझडती केल्यानंतर ईडीनं(ED) राऊतांवर कारवाई केली.
  • राऊतांची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचं पथक आलं होतं. अधिकाऱ्यांची तीन पथकं त्यांच्या विरोधात तपास करत होते.
  • शिवसेना आमदार सुनील राऊत (Shiv Sena MLA Sunil Raut) यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई: Brother Sunil's Raut first reaction after Sanjay Raut's Arrest: शिवसेना नेते (Shiv Sena leader)  आणि खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. 1200 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात 17 तास झाडाझडती केल्यानंतर ईडीनं(ED) राऊतांवर कारवाई केली.  ईडीनं रात्री उशिरा राऊतांवर ही कारवाई केली आहे. रविवारी सकाळपासून राऊतांची चौकशी सुरू होती. राऊतांची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचं पथक आलं होतं. अधिकाऱ्यांची तीन पथकं त्यांच्या विरोधात तपास करत होते. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. संजय राऊतांना अटक होताच संजय राऊत यांचे भाऊ आणि शिवसेना आमदार सुनील राऊत (Shiv Sena MLA Sunil Raut) यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. 

सुनील राऊत यांनी आरोप केली की, खोटी केस तयार करून राऊतांना अटक करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणाशी काहीही संबंध नाही, एक टक्काही नाही, संजय राऊत यांना कागदपत्र वाचून दाखवण्यात आली. यात पत्राचाळीचा उल्लेख कुठेही नाही असंही ते म्हणालेत. 50 लाखांच्या एन्ट्री आणि काहीतरी बोगस केस फाईल बनवून अटक केली असल्याचंही सुनील राऊतांनी सांगितलं. ही खोटी केस दाखवली असून लवकरच संजय राऊत बाहेर येतील. आम्ही न्यायालयीन लढाई लढू, असंही सुनील राऊत यांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचा-   जनरेटरच्या वायरिंगमुळे पिकअप व्हॅनला लागला करंट, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी

पुढे त्यांनी सांगितलं की, सकाळी 9 वाजता संजय राऊतांना वैद्यकीय चाचणीसाठी जे जे रूग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यांची तब्येत ठिक आहे. त्यानंतर 11 वाजता कोर्टात हजर करतील. 

दरम्यान संजय राऊत आणि शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी ही खोटी कारवाई करण्यात आली असल्याचा आरोपही सुनील राऊत यांनी केला आहे. 

ईडीची सकाळपासून सुरू होती कारवाई

संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानी सकाळीच ईडीचे अधिकारी दाखल झाले. यावेळी त्यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांच्या घराची झाडाझडती झाली. राऊतांच्या भांडूप आणि दादर या दोन्ही घरांच्या बाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. यादरम्यान संजय राऊत यांची चौकशी झाली. या चौकशीअंती संजय राऊत यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. यानंतर ईडीच्या मुंबईतील ऑफिसमध्ये नेऊन पुन्हा एकदा संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली. रात्री उशिरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी