पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवर भोंगे हटवण्याची भूमिका घेतल्यापासून मनसेचा पुण्यातील आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ते मनसे सोडणार असल्याची चर्चा गेले काही महिने सुरू होते. दरम्यान, आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि वसंत मोरे यांच्यात भेट झाली. (Sanjay Raut's meeting with Vasant More in Pune, MNS tensions escalated)
अधिक वाचा :
एका लग्नसोहळ्याच्या निमित्ताने संजय राऊत पुण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये मनसेचे वसंत मोरेही उपस्थित होते.अचानक दोन्ही उभय नेत्यांमध्ये भेट झाली. पहिल्याच भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा आहे. यावेळी संजय राऊत यांनी वसंत मोरे यांच्या कामाचे कौतुक केले.
अधिक वाचा :
Heavy Rainfall Alert : पुढील पाच दिवसात वादळाची शक्यता, या भागात पडणार पाऊस
वसंत मोरे यांना मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी पक्षापासून दोन हात लांब राहणे पसंत केले आहे. तसेच त्यांना विविध पक्षांकडून आॅफर येत आहेत. मात्र, अद्याप त्यांनी आपला निर्णय जाहीर केला नाही. अशा परिस्थितीमध्ये संजय राऊत यांनी वसंत मोरे यांच्या पाठीवर हात मारुन त्यांच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केल्याने मनसे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच पाच दहा मिनिटांच्या गप्पानंतर राऊत यांनी 'पुन्हा भेटू' म्हणत एक वेळाच इशारा दिला आहे.