Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश

Satara Court order to file a case against Gautami Patil Viral Video : महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावणाऱ्या डान्सर गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Satara Court order to file a case against Gautami Patil Viral Video
डान्सर गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • डान्सर गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ
  • गुन्हा दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश
  • सातारा कोर्टाने दिला आदेश

Satara Court order to file a case against Gautami Patil Viral Video : महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावणाऱ्या डान्सर गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ झाली आहे. गौतमीच्या डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण गौतमी डान्स करण्याच्या निमित्ताने अश्लील नृत्य करते असा आरोप प्रतिभा शेलार यांनी केला आहे.  प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील विरोधात तक्रार केल्यानंतर सातारा कोर्टाने डान्सर गौतमी पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला. 

अश्लील हावभाव करणे, नागरिकांना घाणेरडे हावभाव करणे, शॉर्ट कपडे घालणे हे प्रकार लोककलेत आणि लावणीत येत नाहीत. पण काही जण झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी अश्लील नृत्य करण्याला प्राधान्य देतात आणि लोककलावंत म्हणून स्वतःची ओळख करून देतात असा आरोप प्रतिभा शेलार यांनी केला. तर गौतमी पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळत निर्दोष असल्याचा दावा केला. 

मी पूर्वी चूक केली होती पण आता मी ही चूक करत नाही. माझे सगळे कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत. जर चूक केली तर माझ्या विरोधात कायद्यानुसार कारवाई करू शकता. पण चूक केली नसताना उगाच माझ्यावर आरोप करायचे आणि माझ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी करायची हे अन्यायकारक असल्याचे गौतमी पाटीलने सांगितले. 

कोणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी एक कलाकार आहे आणि माझी कला सादर करत आहे, असे गौतमी पाटील म्हणाली. तिने अश्लील नृत्य करत असल्याचा आरोप फेटाळला. लोकांचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून ते माझे कार्यक्रम बघतात. माझ्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मी गावोगावी जाऊन माझी कला सादर करते; असेही गौतमी पाटील म्हणाली.

IND vs SL, Video  : श्रेयस अय्यरची बॉलिंग बघून विराट कोहलीची 'बोलती बंद' 

Babar Azam Sexting Video Viral:हनी ट्रॅपमध्ये अडकला पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी