Satara Dcc bank Election : माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव, नाराज कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालय फोडलं

Satara Dcc bank Election माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या होम पिचवरच (जावली तालुक्यात) त्यांच्या विरोधात त्यांचाच कार्यकर्ते असलेले ज्ञानेश्वर रांजणे हे निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. त्यांनी जिल्हा बॅंकेला एका मताने शिंद यांचा पराभव केला

Satara Dcc bank Election: Former Minister MLA Shashikant Shinde defeated by one vote, disgruntled activists blow up NCP office
Satara Dcc bank Election : माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव, नाराज कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालय फोडलं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या होम पिचवरच पराभव
  • त्यांच्या कार्यकत्याने एका मताने केले पराभूत
  • संतप्त कार्यकर्त्यांनी केली राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक

Satara Dcc bank Election सातारा :  सातारा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत हायव्हाॅल्टेज लढत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावली तालुका सोसायटी गटात माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांचा राष्ट्रवादीचे ज्ञानदेव रांजणे यांनी अवघ्या एका मताने पराभव केला. या धक्कादायक निकालानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली. त्यामुळे सातारा आणि जावली तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Satara Dcc bank Election: Former Minister MLA Shashikant Shinde defeated by one vote, disgruntled activists blow up NCP office)

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता आहे. यंदा विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीप्रणीत सहकार पॅनेल स्थापन करण्यात आला. त्यामध्ये भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह ११ बिनविरोध निवडणून आले. तर १० जागांसाठी रविवारी मतदान झाले.

त्यापैकी जावली, सातारा, कराड, खटाव आणि माण या सोसायटी मतदारसंघात संघर्ष टोकाला पोहोचला होता.  अनेक ठिकाणी मतदार पळवापळवी झाल्याने थरार निर्माण झाला होता. सर्वात लक्ष्यवेधी ठरलेल्या जावली मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे  कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांनी दंड थोपटले होते. त्यामुळे ही लढत हायव्हाॅल्टेज ठरली. रविवारी हे मतदार थेट मतदान केंद्रांवरच दाखल होताच जावलीत शिंदे आणि रांजणे समर्थक एकमेकांसमोर आल्याने व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.

आज जिल्हा बॅंकेची मत मोजणी होणार असल्याने केंद्रावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. आज सर्व उमेदवारांचे मतपेटीतील बंद नशीब उघडले. तेव्हा जावली सोसायटी गटाच्या एकूण ४९ मतांपैकी शशिकांत शिंदे यांना 24 व ज्ञानदेव रांजणे यांना 25 मते मिळवले. त्यामुळे ज्ञानदेव रांजणे एका मताने विजयी झाले.

त्यामुळे नाराज झालेल्या आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. तसेच ज्ञानदेव रांजणे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत दगडफेक केली. ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावरही राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा, पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा फोटो आहे. याच कार्यालयावर शशिकांत शिंदे यांच्या कार्याकर्त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीनंतर साताऱ्यात तणाव पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मी एका मताने पराभूत झालो, तो स्वीकारतो, माझ्यासाठी पवारसाहेब, अजितदादा यांनी प्रयत्न केलं. माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी