राष्ट्रवादीतील नेत्यांना सातारचे खासदार म्हणून शरद पवारांचे मित्र झाले नकोसे?, जावलीतील नेत्याच्या वक्तव्याने अनेकांना धक्का

जावळी तालुक्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी भाषणात अनेक धक्कादायक वक्तव्य करून आगामी निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाची चुणूक दाखवली.

Satara MP Sharad Pawar's friend did not like the NCP leaders, many were shocked by the statement of the leader in Jawali
सातारचा खासदार शरद पवारांचा मित्र राष्ट्रवादीतील नेत्यांना झाला नकोसा, जावलीतील नेत्याच्या वक्तव्याने अनेकांना धक्का  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आगामी निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत संघर्ष
  • श्रीनिवास पाटील म्हातारे झाल्याने पुढचा खासदार नितीनकाकाच व्हावेत!
  • जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांचे वक्तव्य

सातारा : सातारा जिल्ह्यात सध्या भाजप खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosle)विरुध्द शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendraje bhosle), उदयनराजे भोसले विरुध्द रामराजे नाईक-निंबाळकर (ramraje naik nimbalkar), तर कधी शशिकांत शिंदे (shashikant shinde) विरुध्द शिवेंद्रसिंहराजे भोसले असा संघर्ष पाहायला मिळत आहेत. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जावलीतून आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केल्यानंतर जावलीतील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांनी आता थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे जिवलग मित्र आणि सातारचे खासदार श्रीनिवास पाटील (MP shirniwas patil)यांच्याविरोधात खळबळजनक वक्तव्य करुन अनेकांना धक्का दिला आहे. (Satara MP Sharad Pawar's friend did not like the NCP leaders, many were shocked by the statement of the leader in Jawali)

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जिल्ह्यात सर्वाधिक आमदार आणि खासदार राष्ट्रवादीचे आहेत. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून विजयी झालेले उदयनराजे भोसले यांनी अवघ्या वर्षभरात राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केला. लोकसभेत विविध प्रश्न उपस्थित करुन अल्पवधीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूक नुकतीच झाली. यात जावली तालुक्यातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पक्षांतर्गत विरोधकांनी बंडखोरी करुन एका मताने त्यांचा पराभव केला. तेव्हापासून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे यांचा आत्मविश्वास वाढला आहे. बॅंकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदी वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

बेलोशी येथे दत्तात्रय कळंबे महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले , जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील व जावली तालुक्यातील नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना वसंतराव मानकुमरे म्हणाले, नितीन काका आता श्रीनिवास पाटील म्हातारे झाले आहेत. पुढील खासदार तुम्हीच व्हायला हवे, आमदार मकरंद आबा पाटील यांनी महाबळेश्वर तालुक्यातील जागा बिनविरोध निवडून आणल्या. लक्ष्मण तात्या यांची पुण्याई त्यामुळे नितीन काकांना अध्यक्षपद मिळाले. पक्षात तुमचे वजन आहे, असे मानकुमरे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी