Satara Shahi Dasara : जलमंदिरमध्ये शाही सिमोल्लंघन सोहळ्यात भवानी तलवारीचे पूजन

गावगाडा
Updated Oct 15, 2021 | 22:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिरमध्ये शाही सिमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले.

Satara Shahi Dasara: Worship of Bhavani Talwari in Shahi Simollanghan ceremony at Jalmandir
Satara Shahi Dasara : जलमंदिरमध्ये शाही सिमोल्लंघन सोहळ्यात भवानी तलवारीचे पूजन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जलमंदिर पॅलेस येथे शाही सिमोल्लंघन सोहळा साजरा झाला.
  • श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी श्री भवानी तलवारीचे पूजन केले
  • तलवार पूजनानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला.

सातारा : विजयादशमी दसऱ्याच्या पारंपरिक उत्साहाला आनंदोत्सवाची जोड देत आज साताऱ्यात शाही सिमोल्लंघन सोहळा साजरा झाला. परंपरेनुसार सूर्यास्ताला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास परंपरेप्रमाणे जलमंदिर पॅलेस येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी श्री भवानी तलवारीचे पूजन केले. त्यानंतर जलमंदिर येथून भवानी तलवारीच्या पुजनानंतर पोवई नाक्यापर्यंत ही भव्य शाही मिरवणूक काढण्यात येत असते. मात्र, कोरोेनाच्या पार्श्वभूमीवर ती रद्द करण्यात आली. मात्र, तलवार पूजनानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. (Satara Shahi Dasara: Worship of Bhavani Talwari in Shahi Simollanghan ceremony at Jalmandir)

छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस याठिकाणी वर्षानुवर्षे परंपरागत शाही सीमोल्लंघन सोहळा साजरा करण्यात येतो. जलमंदिर येथील तुळजाभवानी मंदिरात भवानी मातेच्या तलवारीचे विधिवत पूजन केले. जलमंदिर पॅलेस ते पोवई नाकापर्यंत चालणारी भव्य शाही मिरवणूक मात्र रद्द करण्यात आली आहे. छत्रपतींच्या काळापासून ही मिरवणुकीची ही परंपरा आहे. इतक्या वर्षांनी मागील दोन वर्षांपासून ही परंपरा खंडित होत आहे. यंदा हा शाही सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. 

तलवार पूजन कार्यक्रमानंतर उदयनराजे भोसले यांनी सोन लुटण्याचा कार्यक्रम झाला. उपस्थित नागरिक व उदयनराजे यांनी सोने एकमेकांना देत "सोने घ्या, सोन्यासारखे राहा,' अशा शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी