...म्हणून मी अपक्ष राहणार; सत्यजीत तांबेंनी सांगितलं नेमकं काय काय घडलं?

Nashik MLC Election Satyajeet Tambe : काँग्रेसचे बंडखोर नेते आमदार सत्यजित तांबे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. Nana Patole VS Satyajeet Tambe | नाना पटोले यांनी मला चुकीचे एबी फॉर्म पाठवले होते, असा दावा

Satyajit Tambe told what exactly happened?
...म्हणून मी अपक्ष राहणार; सत्यजीत तांबेंनी सांगितलं नेमकं काय काय घडलं?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सत्यजीत तांबे यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद
  • महिनाभरापासून होत असलेल्या आरोपांना दिले प्रतित्तुर
  • काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप

Nashik MLC Election Satyajeet Tambe : काँग्रेसचे बंडखोर नेते आमदार सत्यजित तांबे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. नाशिक पदवीधर मतदारसंघातून तांबे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. आपण कोणत्याही पक्षात जात नसल्याचे ते म्हणाले. ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि भविष्यातही ते अपक्ष म्हणून काम करतील. (Satyajit Tambe told what exactly happened?)

अधिक वाचा : Horoscope 5 February 2023 : माघी पौर्णिमेला सिंह, तूळ राशीसह या 6 राशींवर होणार लक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे सुधीर तांबे हे गेल्या तीन टर्म (18 वर्षांपासून) महाराष्ट्र विधान परिषदेत नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत आणि त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा करत त्यांनी मुलगा सत्यजित याला निवडणूक लढवायला लावले. त्यानंतर सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. पक्षविरोधी कारवाई म्हणून काँग्रेसने सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांना पक्षातून निलंबित केले. त्यानंतर तांबे कुटुंबीय काँग्रेस सोडून भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा होती.

निवडणुकीतील विजयानंतर सत्यजित तांबे यांच्यावर काही दिवसांपासून होणाऱ्या आरोपींना प्रतित्तुर दिले.  ते म्हणाले, निवडणुकीदरम्यान ज्या पद्धतीने काँग्रेसकडून एबी फॉर्म पाठवण्यात आल्याचे सांगितले गेले, मात्र हे एबी फॉर्मचा चुकीचे असल्याचे समजले. त्यामुळे शेवटी अपक्ष फॉर्म भरावा लागला. महत्वाचे म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस नावांनीच फॉर्म भरला होता, परंतु एबी फॉर्म जोडून न शकल्यामुळे तो खूप अर्ज अपक्ष म्हणून कन्व्हर्ट झाला.

अधिक वाचा : BMC budget 2023-24 : अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय मिळालं, वाचा एका क्लिकवर

सुरुवातीपासून माझे वडील सांगताहेत की मला उभं राहायचं नाही, माझ्या मुलाला करायचं आहे. तर माझ्या वडिलांची उमेदवारी साडेबारा वाजता का जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातल्या एकही विधान परिषदेचा उमेदवार दिल्लीतून जाहीर झाला नाही. अमरावतीतून जे निवडून आले, त्यांचे नाव दिल्लीतून आलं का? नागपूर शिक्षक मतदार संघातून जे निवडून आले त्यांचे नाव दिल्लीतून जाहीर झालं का? मग आम्हालाच उमेदवारी का बर दिल्लीतून दिली. हा पूर्णपणे एका षडयंत्राचा भाग आहे, असा आरोपी तांबे यांनी काॅंग्रेस नेत्यांवर केला.  

तांबे म्हणाले, निवडणुकीच्या काळात अनेक शिक्षक संघटना संघटनांनी मदत केल्याने निवडणूक जिंकलो आहे, मी काँग्रेसमध्येच आहे, मात्र आमदार म्हणून भविष्यामध्ये अपक्षच राहील अशी माझी भूमिका आहे. लोकहिताचे काम करण्यासाठी वेळोवेळी जे जे सरकार असेल, त्या सरकारकडून मदत घेईल, विरोधी पक्ष नेत्यांकडे जाईल, सगळ्यांकडे जाईल, अशी भूमिका सत्यजीत तांबे यांनी मांडली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी