मुंबई : महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे आणि कुंदन शिंदे यांना सीबीआय आज आपल्या ताब्यात घेणार आहे. भ्रष्टाचार प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे सरकारला दणका दिला आहे. देशमुख यांचा समावेश असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची त्यांची याचिका फेटाळण्यात आली. (SC blow to Thackeray government, Deshmukh, Waje and Shinde to be arrested by CBI)
अधिक वाचा : मुंबईत बाईक-टॅक्सी सेवा सुरू, परिवहन विभागाकडून तात्पुरर्ते लायसन्स
देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात ८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी 25 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ईडीला देशमुख यांच्या जामीन अर्जावर आठवडाभरात उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. देशमुख सध्या महाराष्ट्रातील आर्थर रोड कारागृहात आहेत.
अधिक वाचा : चांदोली अभयारण्यात वणवा, वणव्याचे सत्र सुरूच महिन्याभरातील दुसरी घटना
100 कोटी रुपयांची बेकायदेशीर वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने फेब्रुवारीमध्ये देशमुख यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री 1आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी बेकायदेशीरपणे भरपूर पैसा आणि मालमत्ता कमावली आहे. 13 कंपन्यांमध्ये बेकायदेशीररीत्या कमावलेल्या पैशांचा वापर करण्यात आला. या कंपन्या देशमुख यांचे पुत्र किंवा त्यांचे निकटवर्तीय चालवतात.
अधिक वाचा : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! CNG ६ रुपयांनी तर PNG ३.५० रुपयांनी स्वस्त
देशमुख यांच्याशी अनेक सरकारी कर्मचारीही संबंधित असून त्यांच्यामार्फत काम करून घेत असे, असेही आरोपपत्रात म्हटले आहे. याप्रकरणी ईडीने आतापर्यंत ५१ जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी, सीए, राजकारणी आणि बारमालकांचा समावेश आहे. ईडीच्या आरोपपत्रात म्हटले आहे की, मुंबईचे बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी म्हटले आहे की, देशमुख यांनी गृहमंत्री असताना त्यांचे 16 वर्षांचे निलंबन मागे घेण्यासाठी आणि त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी 2 कोटी रुपयांची लाच मागितली होती.