मुंबई : महाराष्ट्रातील शाळा 2 मे 2023 पासून उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बंद केल्या जातील. राज्यातील शाळांमध्ये शुक्रवार 02 मे पासून उन्हाळी सुट्टी सुरू होणार असून शैक्षणिक वर्ष 2023-24 उन्हाळी सुट्टीनंतर सुरू होणार आहे. 12 जून 202३ रोजी सुटी संपल्यानंतर शाळा पुन्हा सुरू होतील. 12 जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. (School will start from June 12 next year In Maharashtra )
शिक्षण विभागाने मंगळवारी जारी केलेल्या सूचनेनुसार 2023- 2024 या शैक्षणिक वर्षाच्या सर्व परीक्षा 02 मे पर्यंत पूर्ण होतील. या पत्रकात दिलेल्या निर्देशानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे. 2 मे पासून सुरू झालेली उन्हाळी सुट्टी ही 11 जून पर्यंत असणार आहे.इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शाळांना 30 एप्रिल रोजी किंवा त्यानंतर उन्हाळी सुट्टीच्या काळात जाहीर करता येणार आहे.
अधिक वाचा : Mumbai Railways: मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार आणखी वेगवान; 33,690 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी
तसेच शाळातून उन्हाळी किंवा दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून नाताळ किंवा गणेशोत्सव दरम्यान समायोजन करण्याचे अधिकार शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीने देण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या 76 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता शिक्षण अधिकाऱ्यांनी द्यावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक काढून विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक यांना आदेश दिले आहेत.