Seat Belt: मुंबईकरांनो आजपासून सीटबेल्ट लावला नाही लावला तर 1000 रू दंड

गावगाडा
Pooja Vichare
Updated Nov 01, 2022 | 10:37 IST

Seat Belt New Rule: आजपासून मुंबईकरांना चारचाकी वाहनामधून प्रवास (traveling) करताना प्रत्येकाला सीट बेल्ट लावावा लागेल. चारचाकी वाहनधारकांसह ( four-wheeler drivers.) प्रवाशांसाठी वाहतूक पोलिसांचा हा नियम बंधनकारक असणार आहे.

Seat Belt New Rule
आजपासून मुंबईत चारचाकी वाहनांमध्ये प्रवाशांनाही सीटबेल्ट सक्ती 
थोडं पण कामाचं
  • आजपासून मुंबईत (Mumbai) चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट (seatbelts ) सक्तीचा असणार आहे.
  • आजपासून मुंबईकरांना चारचाकी वाहनामधून प्रवास (traveling) करताना प्रत्येकाला सीट बेल्ट लावावा लागेल.
  • सीटबेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई 11 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहेत.

मुंबई: Seat Belt New Rule: आजपासून मुंबईत (Mumbai) चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट (seatbelts )  सक्तीचा असणार आहे. त्यामुळे आजपासून मुंबईकरांना चारचाकी वाहनामधून प्रवास (traveling)  करताना प्रत्येकाला सीट बेल्ट लावावा लागेल. चारचाकी वाहनधारकांसह ( four-wheeler drivers.)  प्रवाशांसाठी  वाहतूक पोलिसांचा हा नियम बंधनकारक असणार आहे. 

सीटबेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई 11 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहेत. असे आदेश वाहतूक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे या नियमाचे पालन न करणाऱ्यांना आजपासून वाहतूक पोलिसांकडून कडक समज देण्यात येणार आहे.

अधिक वाचा-  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष

दरम्यान सीटबेल्टच्या सक्तीमधून जुन्या वाहनांना तात्पुरते वगळण्यात आले आहे अशी माहिती देखील वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे. तर आजपासून पुढील दहा दिवासांच्या कालवधीत वाहतूक विभागाकडून जनजागृती केली जाणार आहे. मागच्या आसनांवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नसेल तर चालकाकडून 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. 

बड्या उद्योजकांपैकी एक अशी ओळख असलेल्या सायरस मिस्त्री यांचे पालघर जिल्ह्यातील चारोटी येथे कार अपघातात निधन झाले. ही घटना 4 सप्टेंबर 2022 रोजी घडली. अपघात झाला त्यावेळी कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावला नव्हता. मर्सिडिझ कारमध्ये मागच्या सीटवर बेल्टची व्यवस्था असते. ही व्यवस्था असूनही मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावला नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी कारमध्ये बसलेल्या प्रत्येकाला सीटबेल्ट सक्ती लागू करणार असल्याचे सूतोवाच केले होते. गडकरींच्या या वक्तव्याला काही दिवस झाल्यानंतर मुंबईत कारमध्ये बसलेल्या प्रत्येकाला सीटबेल्ट सक्ती लागू करण्यात आला आहे.

मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019च्या कलम 194 (ब) (1) नुसार मोटर वाहन चालकाने सुरक्षा बेल्टशिवाय वाहन चालवल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सहप्रवाशांनाही सुरक्षा बेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. चालक अथवा सहप्रवाशांनी सुरक्षा बेल्ट न लावता प्रवास केल्यास चालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी