पांडुरंग बरोरांनी घड्याळ सोडून हाती बांधलं शिवबंधन

गावगाडा
Updated Jul 10, 2019 | 14:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pandurang Barora join Shiv Sena: शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पांडुरंग बरोरा यांनी काल (९ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांतर आता शिवसेनेचं शिवबंधन हातावर बांधलं आहे.

Pandurang Barora  joins Shiv Sena
पांडुरंग बरोरा यांचा शिवसेनेत प्रवेश  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका
  • आमदार पांडुरंग बरोरा यांचा शिवसेनेत प्रवेश
  • पांडुरंग बरोरा यांच्यासह कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत प्रवेश

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंनी पांडुरंग बरोरा यांच्या हातावर शिवबंधन बांधलं. पांडुरंग बरोरा यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जोरदार झटका बसला आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पांडुरंग बरोरा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत पांडुरंग बरोरा हे शहापूर विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. पांडुरंग बरोरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे संबंध होते मात्र, गेल्या काही दिवसांपासून पांडूरंग बरोरा हे नाराज असल्याचं बोललं जात होतं. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता पांडुरंग बरोरा यांना शिवसेनेकडून विधानसभेचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  1. येत्या विधानसभेत पुन्हा विधानसभेत भगवा फडकणार 
  2. शिवसेनेला आता आणखीन चांगली बळकटी आली आहे
  3. मी माझ्या जनतेला बांधील आहे
  4. प्रत्येकाच्याच मनात आणि ह्रदयात शिवसेना आहे 
  5. जनतेला हवं ते आपल्याला करायचं आहे 
  6. ही सर्व प्रेमाने जिंकलेली माणसं आहेत

पांडुरंग बरोरा यांनी काल (९ जुलै) आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर आता पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पांडुरंग बरोरा यांचे वडील महादू बरोरा हे यापूर्वी चारवेळा शहापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळे पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला असल्याचं बोललं जात आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य समिती सभापतीपदी शिवसेनेच्या वैशाली चंदे यांची मंगळवारी (९ जुलै) बिनविरोध निवड झाली. यावेळी वैशाली चंदे यांचा सुद्धा उद्धव ठाकरेंनी सत्कार केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पांडुरंग बरोरांनी घड्याळ सोडून हाती बांधलं शिवबंधन Description: Pandurang Barora join Shiv Sena: शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पांडुरंग बरोरा यांनी काल (९ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांतर आता शिवसेनेचं शिवबंधन हातावर बांधलं आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांची अवघ्या 20 दिवसात घरवापसी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांची अवघ्या 20 दिवसात घरवापसी
[Video] राज ठाकरेंनी 'यांना' दिली गरोदर असल्याची उपमा... त्यानंतर मैदान दणाणून सोडले... 
[Video] राज ठाकरेंनी 'यांना' दिली गरोदर असल्याची उपमा... त्यानंतर मैदान दणाणून सोडले... 
Exclusive [VIDEO] 'एकच वादा, रोहित दादा',  मंत्री राम शिंदेंच्या सभेतच घोषणाबाजी
Exclusive [VIDEO] 'एकच वादा, रोहित दादा',  मंत्री राम शिंदेंच्या सभेतच घोषणाबाजी
 उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पूत्रांना धू-धू धुतले... पाहा काय म्हणाले कणकवलीत 
उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पूत्रांना धू-धू धुतले... पाहा काय म्हणाले कणकवलीत 
 १३ वर्ष मंत्रीपद देऊनही काही करता आले नाही तर बांगड्या भरा - पवारांचा यांना टोला 
१३ वर्ष मंत्रीपद देऊनही काही करता आले नाही तर बांगड्या भरा - पवारांचा यांना टोला 
एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर होती, पण...
एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर होती, पण...
Raj Thackeray: पराभव जिव्हारी लागला, तरीही नाशिकवर प्रेमः राज ठाकरे
Raj Thackeray: पराभव जिव्हारी लागला, तरीही नाशिकवर प्रेमः राज ठाकरे
PM Modi: 2022 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा संकल्प, मोदींकडून परळीकरांसाठी भरघोस योजना
PM Modi: 2022 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा संकल्प, मोदींकडून परळीकरांसाठी भरघोस योजना