Umesh Kolhe Case Video : उमेश कोल्हेच्या हत्येच्या आरोपात जेलमध्ये असलेल्या शाहरूखला कैद्यांनी चोपले

Umesh Kolhe Case : उमेश कोल्हेच्या हत्येच्या आरोपात जेलमध्ये असलेल्या शाहरूखला कैद्यांनी चोपले. नंतर खबरदारीचा उपाय म्हणून शाहरूखची रवानगी जेलमधील दुसऱ्या कोठडीत झाली.

SHAHRUKH PATHAN ACCUSED IN AMRAVATI UMESH KOLHE CASE WAS BEATEN IN JAIL CUSTODY
उमेश कोल्हेच्या हत्येच्या आरोपात जेलमध्ये असलेल्या शाहरूखला कैद्यांनी चोपले  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उमेश कोल्हेच्या हत्येच्या आरोपात जेलमध्ये असलेल्या शाहरूखला कैद्यांनी चोपले
  • जेल प्रशासनाने शाहरूखला मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला
  • शाहरूखची रवानगी जेलमधील दुसऱ्या कोठडीत

Umesh Kolhe Case : नुपुर शर्माचे समर्थन करणारा मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करणाऱ्या उमेश कोल्हे याची महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात गळा चिरून हत्या करण्यात आली. उमेशच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शाहरूख पठाण याला अटक केली. सध्या शाहरूख जेलमध्ये आहे. जेलमध्येच कैद्यांनी शाहरूख पठाण याला बेदम चोपले. या प्रकरणात जेल प्रशासनाने शाहरूखला मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाहरूखची रवानगी जेलमधील दुसऱ्या कोठडीत झाली.

२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातून वाचलेला व्यावसायिक मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराच्या कळसाला सोन्याने मढवणार

Uddhav Thackeray 62th Birthday: एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, खास शब्दात केलं Tweet

उमेश कोल्हे याच्या हत्येप्रकरणी स्थानिक पोलिसांनी सात जणांना अटक केली. या सात जणांमध्ये शाहरूख पठाण याचा समावेश होता. शाहरूखला जेलमध्ये कोठडी क्रमांक सात येथे ठेवले होते. तिथेच जेलमध्ये असलेल्या कल्पेश पटेल, हेमंत मनेरिया, अरविंद यादव, श्रवण अवान, संदीप जाधव या आरोपींनी शाहरूख पठाण याला चोपले. मारामारी प्रकरणी तपास सुरू आहे. जेल प्रशासनाने मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात कारवाई सुरू केली आहे.

कशी झाली होती उमेश कोल्हेची हत्या?

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या झाली. ही हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचे एक सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती आले. या फूटेजमध्ये मारेकरी फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांचा बाइकवरून पाठलाग करत असताना स्पष्ट दिसत आहेत. उमेश कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी एक फॉरवर्डेड मेसेज व्हॉट्सअॅपवर निवडक ग्रुपमध्ये शेअर केला होता. या मेसेजला उत्तर म्हणून उमेश कोल्हे यांची सहा जणांनी मिळून सुऱ्याने गळा चिरून हत्या केली. 

उमेश कोल्हे यांनी व्हॉट्सअॅपवर निवडक ग्रुपमध्ये शेअर केलेला फॉरवर्डेड मेसेज नुपुर शर्मा यांच्या संदर्भातला होता. नुपुर शर्मा या भाजपच्या प्रवक्तेपदी असताना त्यांनी पैगंबराविषयी एक वक्तव्य केले होते. एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात (डीबेट शो) हे वक्तव्य करण्यात आले. या घटनेला काही दिवस झाल्यानंतर कार्यक्रमातील विशिष्ट भाग सोशल मीडियावर फिरवून एक वातावरण तयार करण्यात आले. हे प्रकरण शांत झाले असे वाटत असताना महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात आणि राजस्थानमध्ये उदयपूर येथे हत्येच्या घटना घडल्या महाराष्ट्रात उमेश कोल्हे आणि राजस्थानमध्ये टेलर असलेल्या कन्हैय्यालाल यांची हत्या झाली. दोन्ही हत्या या सुऱ्याने गळा चिरून करण्यात आल्या. दोन्ही घटनांमध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्या व्यक्तींनी नुपुर शर्मा यांना पाठिंबा दर्शविणारा वा त्यांचे समर्थन करणारा अशा स्वरुपाचा संदेश सोशल मीडियात फॉरवर्ड वा शेअर केला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी