Sharad Pawar : कोल्हापूर : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून जातीयवाद सुरू झाला अशी टीका राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केली. तसेच यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये विकास होत असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुतीही केली होती. त्यावर शरद पवार यांनी राज ठाकरे महिन्मोहिने गायब असतात असे प्रत्युत्तर दिले आहे. तसेच राज आपल्या वक्तव्यावर आणि भूमिकेवर ठाम नसतात असेही पवार म्हणाले. (sharad pawar criticized raj thackeray over casteism politics ncp)
कोल्हापुरात आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा पवार म्हणाले की, राज ठाकरे काहीही बोलू शकतात. उत्तर प्रदेशचं राज ठाकरे यांना कौतुक वाटतं त्यांना तिथे काय दिसल काय माहित. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला यश मिळाले त्याची कारणे वेगळी आहेत. परंतु लखीमपूरमध्ये शेतकर्यांची हत्या झाली. उत्तर प्रदेशच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत होते. त्यांची समजूत काढण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. योगींच्या राजवटीत अनेक गोष्टी घडल्या. उत्तर प्रदेशमध्ये चांगल्या गोष्टीत होत आहेत असे राज ठाकरे यांचे म्हणने आहे तर त्यावर माझे काही म्हणने नाही. परंतु महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार असे काही होऊ देणार नाही.
राज ठाकरे यांनी मोदींच्या बाबतीत काय काय भूमिका मांडल्या हे महाराष्ट्राने यापूर्वी पाहिले आहे. आता त्यांच्यात काही बदल झालेले दिसत आहेत. राज ठाकरे यांची आजची भूमिका ही भाजप अनुकूल आहे. त्यांच्या भूमिकेत सातत्य नसतं. राज ठाकरे ३ ते ४ माहिने भूमिगत होतात आणि लेक्चर देतात. नंतर पुढचे ३ ते ४ महिने काय करतात हे माहित नाही. ते काही बोलू शकतात त्यांच्या बोलण्यावर कोणी बंदी नाही घालू शकत.
राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व जातींना एकत्र नेणारा पक्ष आहे असे पवार म्हणाले. राज ठाकरे यांची आजची भूमिका ही भाजपला पुरक आहे, उद्या त्यांची भूमिका काय असेल सांगता येत नाही. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास वाचावा. छगन भुजबळ आणि मधुकर पिचडसारख्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या विधीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व केले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे हे दोन्ही नेते कुठल्या समाजाचे अहएत. राज ठाकरे तीन चार महिने भूमिगत असतात आणि असे भाषण देऊन पुन्हा गायब होतात. तीन चार महिने ते काय करतात असा मला प्रश्न पडतो असेही पवार म्हणाले.