राज्यपालांच्या वक्तव्यावेळी मंचावर असताना आक्षेप का घेतला नाही? शरद पवारांनी म्हटलं...

Sharad Pawar PC: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर भाष्य केलं आहे.

Sharad Pawar statement over controversial statement of Bhagatsingh koshyari on Chhatrapati Shivaji Maharaj
राज्यपालांच्या वक्तव्यावेळी मंचावर असताना आक्षेप का घेतला नाही? शरद पवारांनी म्हटलं...  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्या - शरद पवार
  • राज्यपालांबाबत राष्ट्रपती, पंतप्रधान यांनीच दखल घ्यावी  - शरद पवार
  • अशी वक्तव्ये करणाऱ्यांकडे मोठी जबाबदारी देणे योग्य नाही  - शरद पवार

Sharad Pawar on Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्यपालांनी आपले पद सोडावे अशी मागणी सुद्धा जोर धरत आहे. त्याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सर्व मर्यादा सोडल्या असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. (Sharad Pawar statement over controversial statement of Bhagatsingh koshyari on Chhatrapati Shivaji Maharaj)

नेमकं काय म्हणाले शरद पवार? 

शरद पवार म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या वक्तव्य पाहता आता त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत. काल त्यांनी एक निवेदन काढत शिवाजी महाराजांचं कौतुक केलं. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यावर सुचलेलं उशीराचं शहाणपण आहे. म्हणून मला स्वत:ला असं वाटतं की याचा निकाल हा माननीय राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी घेतला पाहिजे. अशी वक्तव्ये करणाऱ्यांकडे मोठी जबाबदारी देणे योग्य नाही.

हे पण वाचा : काळ्या मिरीचे हे उपाय करतील तुम्हाला गडगंज श्रीमंत

मंचावर उपस्थित असताना आक्षेप का घेतला नाही?

ज्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत विधान केलं त्यावेळी मंचावर शरद पवार होते आणि मग त्यावेळीच शरद पवारांनी निषेध करायला हवा होता. मी जर असतो तर पदवी स्वीकारली नसती असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं होतं. यावर शरद पवारांना विचारले असता त्यांना म्हटलं, सर्व कार्यक्रम होऊन गेला होता आणि त्यानंतर राज्यपालांचं भाषण झालं.

हे पण वाचा : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल या गोष्टींची घ्या काळजी

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केला आहे. असा दावा गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सुद्धा करत आहोत. आम्ही बेळगाव मागतो, आम्ही कारवार मागतो आम्ही निपाणी मागतो. त्या ठिकाणी यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका सुद्धा झाल्या आणि अनेकवेळा जिंकल्या सुद्धा. जी महाराष्ट्राची मागणी आहे त्यात सातत्य आहे. आज तेथील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, काही गावे आम्हाला हवी आहेत. त्या गावांबाबत आम्ही सांगू शकत नाही. पण बेळगाव, निपाणी, कारवार हे जर ते सोडणार असतील तर चर्चा होऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी