Pune Metro ची शरद पवारांनी घेतली ट्रायल, अन् चंद्रकांत पाटील भडकले कंपनीच्या अधिकाऱ्यांवर

शरद पवार यांनी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पुणे मेट्रोतून प्रवास केला. त्यांनी अचानक मेट्रो स्थानकाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. फुगेवाडी स्थानक ते पिंपरीतील संत तुकाराम नगरपर्यंत त्यांनी उभे राहूनच प्रवास केला.

Sharad Pawar takes trial of Pune Metro, and Chandrakant Patil gets angry with company officials
Sharad Pawar takes trial of Pune Metro, and Chandrakant Patil gets angry with company officials  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पिंपरीमधील फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा शरद पवार यांनी आज मेट्रो प्रवास केला
  • पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या.
  • पवारांच्या या पाहणीला भारतीय जनता पक्षानं आक्षेप घेतला आहे.

पुणे  : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सकाळी ९ वाजता अचानक मेट्रो प्रवास केला. पिंपरीतील फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा उभ्याने प्रवास करीत त्यांनी मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. दरम्यान, पवारांच्या प्रवासावर भाजपने आक्षेप घेतला असून कंपनीवर हक्कभंग आणणार असल्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. (Sharad Pawar takes trial of Pune Metro, and Chandrakant Patil gets angry with company officials)

पुणे मेट्रोचे पिंपरीतील काम अंतिम टप्प्यात आहे. आज शरद पवार यांनी सकाळी फुगेवाडी येथील मेट्रो स्थानकाला भेट दिली. शरद पवार यांनी दीड तास थांबून मेट्रोच्या आधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन मेट्रोचं काम किती झालं? कधीपर्यंत ऊर्वरित काम पूर्ण होईल? कामात काही अडथळा आहे का? मेट्रोच्या कामासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे आदी माहिती या अधिकाऱ्यांकडून पवारांनी घेतली.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे,आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाना काटे, विशाल वाकडकर, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

पवारांच्या प्रवासावर भाजपने आक्षेप घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले,  'शरद पवार साहेबांबद्दल आम्हाला आदरच आहे. ते राज्यसभा सदस्य आहेत. परंतु अशा प्रकारे घाईघाईत ट्रायल घेण्याचं कारण काय? ही श्रेयवादाची लढाई सुरू आहे का? सुमारे ११ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. त्यातील ८ हजार कोटी रुपयांचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान केंद्र सरकारचं आहे. तीन हजार कोटी महापालिकेचे व काही प्रमाणात राज्याचं योगदान आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मेट्रोचं उद्घाटन होणार होतं. पण कोविड स्थितीमुळं ते लांबवणीवर पडलं. मग मेट्रो कंपनीला इतकी घाई का झाली?,' असा सवाल पाटील यांनी केला.

तसेच कोणालाही न कळवता मेट्रोची चाचणी घेतल्याबद्दल मी पुणे-पिंपरीतील सर्व आमदारांना आवाहन करतो की त्यांनी मेट्रोच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी