शरद पवारांची मोठी खेळी !, राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त

Dissolves all cell of NCP राष्ट्रवादीच्या सर्व विभाग आणि सेलच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादीचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी सर्व सेल प्रमुखांना दिले आहे.

Sharad Pawar's big move!, all sections and cells of NCP dissolved
शरद पवारांची मोठी खेळी !, राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाच्या निकालानंतर शरद पवारांचा मोठा निर्णय
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त
  • लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर होणार

मुंबई : राज्यातील आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाने होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज तसा निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. (Sharad Pawar's big move!, all sections and cells of NCP dissolved)

अधिक वाचा : धो-धो पावसातल्या सभेची पुनश्च प्रचि! शिवसेनेला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंची बंडखोरांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा

राष्ट्रवादीच्या सर्व विभाग आणि सेलच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादीचे सचिव खा. प्रफुल्ल पटेल यांनी सर्व सेल प्रमुखांना दिले आहे. निवडणुकीपूर्वी जुन्या पदाधिकाऱ्यांची बदली करून नव्या नियुक्त्या केल्या जातील, असे मानले जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवालातील शिफारशी स्वीकारून ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास आज मान्यता दिली. न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो.

अधिक वाचा : कोरोनाचा वेग थांबेना ! राज्यात कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 14, 636 वर 

हे आरक्षण टिकावे यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वाने प्रामाणिक प्रयत्न केले आणि आज त्याची परिणती या निर्णयात दिसली. मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करत राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. ओबीसी समाजासोबत आम्ही नेहमीच असून त्यांच्या उन्नतीप्रतिची बांधिलकी कायमच राहील, याचा पुनरुच्चार या निमित्ताने करतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी