Maharashtra News: राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच, कुणाकुणाला मिळणार संधी?

गावगाडा
Pooja Vichare
Updated Nov 12, 2022 | 09:08 IST

Maharashtra Political News: शिंदे आणि फडणवीस सरकारचा (Shinde and Fadnavis government ) लवकरच मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion होणार आहे. सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Shinde-Fadnavis government Cabinet expansion
शिंदे- फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्पातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच  
थोडं पण कामाचं
  • शिंदे आणि फडणवीस सरकारचा (Shinde and Fadnavis government ) लवकरच मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion होणार आहे.
  • सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
  • राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 9 ऑगस्ट 2022 रोजी झाला होता.

मुंबई: Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसतात. त्यातच आता महाराष्ट्रातील राजकारणातील ( Maharashtra politics)  सर्वांत मोठी बातमी समोर येतेय. शिंदे आणि फडणवीस सरकारचा (Shinde and Fadnavis government )  लवकरच मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion होणार आहे. सरकारच्या  दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. 

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 9 ऑगस्ट 2022 रोजी झाला होता. आता शिंदे- फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दुसऱ्या टप्प्यातील विस्तार मंत्रिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विस्तारात शिंदे गटातील काही आमदार आणि भाजपमधील काही आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. 

अधिक वाचा-  Rajiv Gandhi : राजीव गांधी हत्येप्रकरणी सर्व आरोपींची सुटका, तमिळनाडूत फटाके फोडून जल्लोष

सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराला बराच उशीरा झाला होता. सरकारनं जवळपास एक महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार निर्णय घेतला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सध्या राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 18 कॅबिनेट मंत्री आहेत. शिंदे गटाचे आणि भाजप गटाचे प्रत्येकी नऊ असे मंत्री आहेत. यानंतर अजूनही 20 ते 22 राज्यातील मंत्रिपदं शिल्लक आहेत. त्यामळे आता सरकारच्या पुढील म्हणजेच दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्व आमदारांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी