Vinayak Mete: मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचे अपघाती निधन

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 14, 2022 | 12:37 IST

vinayak mete death news: एक वाईट बातमी समोर येतेय. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता.

Vinayak Mete Died
विनायक मेटे यांचे निधन 
थोडं पण कामाचं
  • आमदार विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला.
  • या अपघातात मेटे यांचं निधन झालं आहे.
  • मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे.

रायगड: vinayak mete Died: एक वाईट बातमी समोर येतेय.  शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete)  यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.  अपघात एवढा भीषण होता, की मेटे यांच्या कारचा चक्काचूर झाला. तसं मेटे बसलेली डावी बाजूच्या कारचा चक्काचूर झाल्याचं दिसत आहे. 

अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नाही माहिती मिळतेय.  मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.

अधिक वाचा-  Terror Attack: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दहशतवादी हल्ल्यानं हादरलं जम्मू-काश्मीर, ग्रेनेड हल्ल्यात जवान जखमी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एमजीएमला पोहोचले आहेत.  अपघाताचे वृत्त समजताच भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर रूग्णालयात पोहोचले.

विनायक मेटे यांच्या कारचा अपघात 

आज पहाटे 5:30 वाजता हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिली. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला आहे. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाल्याचीही माहिती मिळतेय. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी