Sanjay Shirsat Criticism Uddhav Thackeray: ''शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही'', आमदार संजय शिरसाट यांचा इशारा

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 26, 2022 | 12:45 IST

Sanjay Shirsat Reaction On Uddhav Thackeray Interview: शिंदे गटात गेलेले औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (Aurangabad MLA Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

Uddhav Thackeray and Eknath shinde
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे 
थोडं पण कामाचं
  • उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना (Rebel MLAs) एक प्रकारचा इशारा दिला आहे.
  • उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केलेल्यांना पालापाचोळा असं म्हटलं आहे.
  • औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (Aurangabad MLA Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

मुंबई: Sanjay Shirsat On Uddhav Thackeray: सामनाचे संपादक (Saamna editor) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray)  यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा काही भाग जारी करण्यात आला आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना (Rebel MLAs) एक प्रकारचा इशारा दिला आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केलेल्यांना पालापाचोळा असं म्हटलं आहे. आता यावर शिंदे गटात गेलेले औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (Aurangabad MLA Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.  शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ही तुमची प्रॉपर्टी नाही. ते प्रत्येक शिवसैनिकांचं (Shivsainik) दैवत आहे, अशा शब्दात शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. पुढे त्यांनी ठाकरेंना इशारा देत म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव सभेत घेतलं जातं. त्या उंचीच्या नेत्याला एवढं खुजं करू नका. 

अधिक वाचा-  अप्पूच्या खडूसनं Instagram वर गाठला मोठा पल्ला

शिवसेना प्रमुखांची उंची तुम्ही कमी करू नका. त्यांच्या पुण्याईमुळे आम्ही घडलोत. त्यांना तुम्ही एवढं छोटं कमी करण्याचा का प्रयत्न करताय? राजकारण करायचं तर स्वतःचा ठसा उमटवा, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

''पालापाचोळा असे कसे म्हणू शकता''

उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत शिवसेनेतून बाहेर गेलेल्यांना पानं गळाली, पालापाचोळा असा उल्लेख केला. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, पालापाचोळा असे कसे म्हणू शकतात, सरपोतदार, ढाके, मनोहर जोशी, आशे, हे पाला पाचोळा नाहीत, या सर्वांच्या सावलीत तर आम्ही सगळे जण वाढलो आहोत. जी पाने गळाली आहेत ना त्यांचा अपमान करू नका. आज आम्हीही पाहत आहोत. मनोहर जोशी, ढाके हे उद्धव ठाकरेंच्या बाजुला बसलेले दिसत नाही, असा टोला ही संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

पुढे संजय शिरसाट म्हणाले की, काळानुसार गोष्टी बदलत जातात. नव्यांचं स्वागत करा, पण आपल्या घरातल्यांना विसरू नका. हे विसरले तर तुम्ही शिवसैनिकां पालापाचोळा म्हणू नका. आम्ही पालापाचोळा नाही. आम्ही आयुष्यातील 38 वर्षे शिवसेनेसाठी घालावली आहेत. शिवसेना वाढीसाठी शिवसेना पक्षप्रमुख त्यावेळी अख्या महाराष्ट्रात फिरत नव्हते तिथे शिवसेनेसाठी फिरणारे सैनिक आणि नेते होते. तुम्हाला जर कुणी पाला पाचोळा म्हटलं तर तुम्हाला कसे वाटेल असा उलट प्रश्न संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. 

''आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी अभिषेक केला''

या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मी आजारी असताना एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याचा आरोप केला आहे. मात्र यावर प्रतिक्रिया देताना हा आरोप संजय शिरसाट यांनी फेटाळून लावला आहे. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुलाखती दरम्यान दिलेलं स्टेटमेंट चुकीचं आहे.  हे सर्व चुकीचे आहे मी या सर्व गोष्टींचा साक्षीदार आहे. सत्तेत जाण्यासाठी शिंदे साहेबांनी हा उठाव केला नव्हता.  त्यांच्याकडे नगरविकास सारखं महत्त्वाचं खातं होतं. 

अधिक वाचा-  Watch Video: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, CSMT ला लोकलचा डब्बा रूळावरून घसरला

पुढे शिरसाट म्हणतात की, मी आजारी असताना हा प्रकार केल्याचं उद्धव ठाकरे सांगत आहेत. हे खोटं आहे. आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी अभिषेक केला. ही दोन वर्षांपासूनची प्रक्रिया आहे. ते बरे झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला नको आहेत, असं आम्ही म्हटलं. पण आजही मुलाखतीतून त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचाच पुळका आलेला दिसून आलं. त्या पक्षांनाच त्यांनी मोठं म्हटलंय, याचं वाईट वाटतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी