Uddhav Thackeray: 'तिकडे शेपट्या घालायच्या अन् इकडे पंजा काढायचा', ठाकरे मोदी-शाहांवर कडाडले...

गावगाडा
रोहित गोळे
Updated Oct 06, 2022 | 00:32 IST

Uddhav Thackeray Criticized PM Modi: मुंबईतील दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.

shiv sena chief uddhav thackeray criticized pm modi and amit shah over pok land
'तिकडे शेपट्या घालायच्या अन् इकडे पंजा काढायचा', ठाकरे मोदी-शाहांवर कडाडले... 
थोडं पण कामाचं
  • दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची सरकारवर तुफान टीका
  • पाकव्याप्त काश्मीर भारतात पुन्हा आणून दाखवण्याचं आव्हान
  • मोदी-शाहांवर उद्धव ठाकरेंची टीका

Uddhav Thackeray Criticized PM Modi: मुंबई: मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा आज (5 ऑक्टोबर) पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान टीका केली. मात्र यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील घणाघाती टीका केली. गृहमंत्री हे फक्त इतर राज्यांमध्ये काड्या घालण्याची कामं करतात, इकडंचं सरकार पाड, तिकडे फोडाफोडी कर एवढंच काम ते करतात. अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (shiv sena chief uddhav thackeray criticized pm modi and amit shah over pok land)

याचवेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. आज आठ वर्ष झाली.. मोदींच्या त्या मुलाखती आजही ऐकतो आम्ही. 'पाकिस्तान को उसी की भाषा मै उत्तर देना चाहिए... कौनसी भाषा..' पाकव्याप्त काश्मीरमधला एक इंच तुकडा देखील तुम्ही परत घेऊ शकलेला नाहीत. चीन घुसलाय अरुणाचलमध्ये, लडाखमध्ये. जा.. ती जमीन घेऊन दाखवा. पण तिकडे शेपट्या घालायच्या. आणि इकडे येऊन पंजा काढायचा.' असं म्हणत उद्धव ठाकरेंवी मोदी-शाहांवर टीका केली आहे.

अधिक वाचा:  एकनाथ शिंदे यांचे बीकेसीतील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

पाहा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील नेमके मुद्दे

'मुळात आपल्या देशाचे गृहमंत्री हे देशाचे गृहमंत्री आहेत? का भाजपचे घरगुती मंत्री आहेत हेच कळत नाही. या राज्यात जा, त्या राज्यात जा. हे सरकार पाड ते सरकार पाड.. काड्या घाल. मध्येच मुंबईत येणार. शिवसेनेला जमीन दाखवा.. बघा ना आम्ही जमिनीवरच बसलो आहोत. आम्ही जमिनीवरचीच माणसं आहोत. मी आजसुद्धा त्यांना आव्हान देतो... आम्हाला जमीन बघायचीच आहे. अमित शाहजी आम्हाला जमीन दाखवा. मग ती पाकव्याप्त काश्मीरची जमीन दाखवा. जिंकून दाखवा ती जमीन.' 

'आज आठ वर्ष झाली.. मोदींच्या त्या मुलाखती आजही ऐकतो आम्ही. 'पाकिस्तान को उसी की भाषा मै उत्तर देना चाहिए... कौनसी भाषा..' पाकव्याप्त काश्मीरमधला एक इंच तुकडा देखील तुम्ही परत घेऊ शकलेला नाहीत. चीन घुसलाय अरुणाचलमध्ये, लडाखमध्ये. जा.. ती जमीन घेऊन दाखवा. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. हे कशाला हवेत गद्दार. आम्ही नाचतो.. मागे नाचत होतो तसे.' 

अधिक वाचा: अर्ध्या खुर्च्या रिकाम्या तरी मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण सुरू

'गद्दारांच्या पालखीत बसून कशाला मिरवताय मिरवणुका.. हे माझे सैनिक आहेत ते घेऊन नाचतील तुम्हाला. पाकव्याप्त काश्मीर जिंकून दाखवलं तर.. पण तिकडे शेपट्या घालायच्या. आणि इकडे येऊन पंजा काढायचा.' 

'मोठमोठे प्रकल्प प्रकल्प गुजरातमध्ये चालले आहेत आणि हे मिंधे सरकार माना खाली घालून बसले आहेत. तो पुष्पा आलेला ना.. त्यात तो म्हणतो ना.. मै झुकेंगा नही साला आणि हे म्हणतात उठेंगा नही साला...' 

'मला वाटतं उद्या परवा यांच्या सरकारची शंभरी भरतेय.. म्हणजे 100 दिवस पूर्ण होतायेत. पण या 100 दिवसात 90 दिवस तर दिल्लीला गेले असतील. नुसतं तिकडे कुर्निसात करायला. दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ. पण हे जे महत्त्वाचे विषय आहेत त्यावर बोलायला तयार नाही.' 

अधिक वाचा: 'बाप चोरणारी अवलाद... स्वत:च्या वडिलांचं तरी नाव लावायचं ना'

'माझं तर आज स्पष्ट मत आहे.. कारण आता देशातील लोकशाही जिवंत राहते की नाही हा सवाल आहे. कारण भाजपचे अध्यक्ष नड्डा येऊन बोलले की, शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. देशात दुसरे कोणते पक्ष शिल्लक राहणार नाही. तुम्हाला सगळ्यांना सावधानतेचा इशारा देतोय. देश हुकूमशाहीकडे चालला आहे. जे-जे देशप्रेमी असतील त्यांनी देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं.' 

'मोहन भागवतांबद्दल मला आदर आहेच. ते मधल्या काळात मशिदीत जाऊन आले. काय हिंदुत्व सोडलं की, मिंधे गटाने नमाज पडायला सुरुवात केली? कशासाठी गेले होते मोहन भागवत.. ते गेलो होते संवाद करण्यासाठी. पण आम्ही काँग्रेससोबत गेलो की हिंदुत्व सोडलं.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि शाह यांच्यावर टीकेची झोड उठवली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी