Dasara Melava 2022: आज ठाकरे आणि शिंदे यांच्यात महामुकाबला, दोन्ही बाजूंनी तोफा धडाडणार; संपूर्ण राज्याचं लक्ष

गावगाडा
Pooja Vichare
Updated Oct 05, 2022 | 07:15 IST

Dasara Melava 2022: शिवसेना पक्षातल्या फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray ) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आज दसरा मेळावा घेण्यात येणार आहे.

Shivsena Dasara Melava 2022
आज तोफ धडाडणार, उद्धव ठाकरे vs एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेतल्या (Shivsena)बंडानंतर पक्षातील दोन गटांचे दसरा मेळावे पार पडणार आहेत.
  • अधिकाधिक गर्दी जमवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सज्ज झाले आहेत.
  • शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच होणाऱ्या दोन दसरा मेळाव्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे.

मुंबई: Shivsena Dasara Melava 2022: आज दसरा (Dussehra) आहे. या दसऱ्याच्या निमित्तानं राज्यातील जनता महामुकाबला बघणार आहे कारण शिवसेनेतल्या (Shivsena)बंडानंतर पक्षातील दोन गटांचे दसरा मेळावे पार पडणार आहेत. शिवसेना पक्षातल्या फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray ) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Chief Minister Eknath Shinde) आज दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच होणाऱ्या दोन दसरा मेळाव्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. 

अधिकाधिक गर्दी जमवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सज्ज झाले आहेत. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. तसंच दोन्ही बाजूंनी आरोपांच्या तोफा धडाडणार आहेत. याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मेळाव्याला येतील, याची व्यवस्था दोन्ही गटांनी केली आहे. आजचा दसरा मेळावा यशस्वी व्हावा यासाठी दोन्ही गटानं चांगलीच कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

अधिक वाचा- Mumbai University Exam postponed: मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या

शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात होईल. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे- कुर्ला संकुलात होणार आहे. बीकेसी मैदानावर दोन ते तीन लाख कार्यकर्ते जमतील असा दावा, शिंदे गटाकडून केला जात आहे. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे यांच्याकडून तयारी पूर्ण झाली आहे. राज्यभरातून चार-पाच हजार एसटी, खासगी बसगाड्या आणि हजारो खासगी वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत.

दरम्यान आजच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेनेतील  पदाधिकारी, माजी खासदार, आमदार आणि मुंबईतील काही माजी नगरसेवक यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

शिंदे गटाच्या चांदीच्या तलवारीची चर्चा 

BKC येथील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी 51 फुटी तलावर ठेवण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या तलवारीचे शस्त्रपूजन करण्यात येणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना 12 फुटी चांदीची तलवार देण्यात येणार आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी