Shiv Sena News: उद्धव ठाकरेंची साथ न सोडलेल्या आमदाराला मिळालं मोठं गिफ्ट

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 10, 2022 | 12:43 IST

Shiv Sena:विधान परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षास विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेनेला विधान परिषदेत अधिकृतच मान्यता दिली आहे.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • विधान परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षास विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
  • यासंदर्भातली अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून काढण्यात आली आहे.
  • शिवसेना खासदार अरविंद सावंत (Shiv Sena MP Arvind Sawant) यांनी दिली आहे.

मुंबई: Maharashtra Legislative Council News: मंगळवारी  शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis government) सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) अखेर पार पडला. त्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षास विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेनेला विधान परिषदेत अधिकृतच मान्यता दिली आहे. शिवसेना पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदी (Leader of Opposition)  शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Shiv Sena MLA Ambadas Danve) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातली अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून काढण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सर्व नेत्यांशी चर्चा करून अंबादास दानवे यांचं नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत (Shiv Sena MP Arvind Sawant) यांनी दिली आहे. 

यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते करतील अशी चर्चा होती. मात्र, आता आमदार अंबादास दानवे यांना हे पद देण्यात आलं आहे. सोमवारी अरविंद सावंत यांनी माहिती दिली होती की, अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्ष पदासाठी निवड करण्यात आली आहे. आज या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. 

अधिक वाचा- पुणे हादरलं,भरदिवसा अपहरण करून 7 वर्षांच्या मुलीवर लैंगिक शोषणाचा प्रयत्न

काय म्हणाले होते अरविंद सावंत 

उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विधान परिषदेच्या विरोधी पक्ष पदावर अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी अशा प्रकारची शिफारस उपसभापती यांच्याकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती होईल असं म्हणत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसोबत विचारविनिमय आणि चर्चा करून निर्णय घेतला असल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलं होतं. 

असं कोसळलं ठाकरे सरकार 

शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली. हे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटात सामिल झाले. यामुळे राज्यातलं ठाकरे यांचं सरकार कोसळलं. सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे शिवसेनेच्या 40 आमदारांचा पाठिंबा आबे. तर उद्धव ठाकरेंकडे केवळ 15आमदारांचा पाठिंबा आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाचे दोन गट झाले आणि शिवसेना दोन गटात विभागली गेली.

दरम्यान एकनाथ शिंदे आमदारांसह भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर या सरकारचा कालच पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. ज्यामध्ये शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9-9 जणांनी शपथ घेतली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी