Shivsena Symbol Case: धनुष्यबाण कुणाचा ?, दोन्ही गटांनी निवडणूक आयोगासमोर काय केला युक्तिवाद

Shivsena Symbol Case: महाराष्ट्रात काही महिन्यांपासून सत्तासंघर्ष सुरू आहे. त्यातही शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने याप्रकरणाची सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. यासंदर्भात ठाकरे आणि शिंदे गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे.

Shiv Sena's symbol battle got date again
Shivsena Symbol Case: धनुष्यबाण कुणाचा ?, दोन्ही गटांनी निवडणूक आयोगासमोर काय केला युक्तिवाद ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेना कुणाची याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी
  • शिंदे गटाकडून महेश जेठमलानींचा युक्तीवाद
  • ठाकरे गटाकडून कपील सिब्बलांनी मांडली बाजू

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षामुळे महाराष्ट्र सरकारच्या स्थापनेवर निर्माण झालेल्या प्रश्नांवर आता 14 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी १४ फेब्रुवारीची तारीख निश्चित केली आहे. दरम्यान, शिवसेना कुणाची आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे याबाबत दिल्लीत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असून दोन्ही गटांकडून युक्तिवाद केला जात आहे. (Shiv Sena's symbol battle got date again)

अधिक वाचा : Mumbai Local Train: धावत्या ट्रेनमधून तो कोसळला अन् मदतीसाठी पोलीस कर्मचारी देवदूतासारखा धावला

राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने मंगळवारी पुढील तारीख दिली असून आता पुढील सुनावणी १४ जानेवारीला होणार आहे. त्यापुर्वी खरी शिवसेना आमची असल्याचा दावा शिंदे आणि ठाकरे गटांकडून केला जात आहे.  शिवसेना ठाकरे गटाकडून २२ लाख २४ हजार प्रतिज्ञापत्र दिले आहे. तर शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र ४ लाख ५१ हजारांच्या जवळपास प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आली.

अधिक वाचा : weather maharashtra : महाराष्ट्राच्या काही भागांत थंडीची लाट येणार

शिंदे गटाकडून महेश जेठमलानी असा दावा करण्यात आला की, आमच्याकडे आमदार, खासदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेवर शिंदे गटाचा दावा अधिक आहे. तसेच शिंदे गटाची रचना शिवसेनेच्या घटनेनुसारच झाली आहे, असे सांगितले जात आहे. तर ठाकरे गटाकडून कपील सिब्बल यांनी शिंदे गटाची कागदपत्रे ही खोटी असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी