नवणीत राणा यांनी आधी अमरावतीतील विभाग प्रमुखाच्या घरासोमर हनुमान चालीसा म्हणून दाखवावी , शिवसेना उदय सामंत याचे आव्हान

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने मित्रपक्षांचा अपमान केला अशी टीका शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केली. तसेच खासदार नवणीत राणा यांनी आधी अमरावतीत शिवसेनेच्या विभाग प्रमुखाच्या घरासमोर हनुमान चालीसा लावून दाखवावी असे आव्हानही दिले आहे. 

uday samant
उदय सामंत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने मित्रपक्षांचा अपमान केला
  • अशी टीका शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केली.
  • नवणीत राणा यांनी आधी अमरावतीत शिवसेनेच्या विभाग प्रमुखाच्या घरासमोर हनुमान चालीसा लावून दाखवावी

Uday Samant : मुंबई :  कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने मित्रपक्षांचा अपमान केला अशी टीका शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केली. तसेच खासदार नवणीत राणा यांनी आधी अमरावतीत शिवसेनेच्या विभाग प्रमुखाच्या घरासमोर हनुमान चालीसा लावून दाखवावी असे आव्हानही दिले आहे. 

सामंत म्हणाले की, कोल्हापुरात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाल्याचे चित्र महाराष्ट्रात उभं केले जात आहे. परंतु भाजपसोबत शिवसंग्राम, रासप, आरपीय, ताराराणी आघाडी तसेच पूर्वीचे आमचे काही मित्र पक्ष भाजपला सामील झाले होते. परंतु भाजप म्हणत आहे की आम्ही एकटे लढलो आणि हे आमचे मताधिक्य आहे याचा अर्थ भाजप सोबत कुठलेच मित्रपक्ष नव्हते असा अर्थ होतो. भाजप आपल्याच मित्रपक्षांवर टीका करत आहे. इतर पक्षांचे तिथे अस्तित्व नाही यासाठी आपण ते ट्विट केल्याचे सामंत म्हणाले. 

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे ही फार मोठी फॅशन झाली आहे. ज्या पक्षांचे अस्तित्व संपले आहे, अशा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याने त्यांना टीव्हीवर दिसण्याची संधी मिळते. मातोश्री तर दूर खासदार नवणीत राणा यांनी अमरावतीतील शिवसेना शाखाप्रमुखाच्या समोर हनुमान चालीसा लावावी, त्याची तारीखही आधी सांगावी, मातोश्री खूप दूर आहे. जेव्या एक व्यक्ती लोकप्रतिनिधी होते, खासदार किंवा आमदार होते त्यांनी एक राजकीय संस्कृती पाळावी. ज्यांना राजकीय संस्कृती नाही त्यांच्याबद्दल बोलणे चुकीचे आहे आणि त्यांची दखल घेण्याचीही गरज नाही. अशा वक्तव्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील. जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण होईल असेही सामंत म्हणाले.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी