उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, हिंगोलीतल्या आमदारानं सोडली शिवसेनेची साथ; शिंदे गटात दाखल

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 04, 2022 | 11:07 IST

Maharashtra Politics Shivsena: शिंदे गट आणि भाजप सरकारची बहुमत चाचणी होण्याआधीच शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे 
थोडं पण कामाचं
  • आज शिंदे आणि फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
  • विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे.
  • आवाजी मतदानानं बहुमत चाचणी होणारेय.

मुंबई:  Maharashtra Politics  Shivsena: राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारची आज विधानसभेत बहुमत चाचणी होण्यासाठी काही वेळ शिल्लक आहे. मात्र शिंदे गट आणि भाजप सरकारची बहुमत चाचणी होण्याआधीच शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.  शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे सुद्धा शिंदे गटात दाखल झाले आहेत.  आज शिंदे आणि फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे. आवाजी मतदानानं बहुमत चाचणी होणारेय. विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. मात्र आज शिंदे सरकारची खरी कसोटी आहे. 

शिवसेना पक्षात बंड झाल्यानंतर संतोष बांगर यांनी एकदम भावनिक भाषण केलं होतं. तसंच त्यांनी आपल्या जिल्ह्यात बंडखोरांविरोधात जाहीर भूमिकाही घेतली होती. मात्र आता बांगर यांनी बहुमत चाचणी होण्याआधी ठाकरेंना धक्का दिला आहे. संतोष बांगर हे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार आहेत. बांगर शिंदे गटात सामील झाल्यानं शिंदे गटातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या 40 वर गेली आहे. 

बंडखोरांविरोधात केलं होतं वादग्रस्त विधान

ज्यांनी शिवसेनेसोबत बेइमानी केली त्यांच्यावर त्यांचा बायकासुद्धा भरोसा करणार नाही इतकेच काय तर त्यांची मुलं सुद्धा अविवाहित मरणार आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य  संतोष बांगर यांनी केलं होतं. बांगर यांनी आमदारांनी केलेल्या बंडखोरी विरोधात कडक भूमिका घेतली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांना मोठा पाठिंबा दिला होता. 

अधिक वाचा- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचे EDचे समन्स

आज सत्ताधारी- विरोधक आमनेसामने 

आज सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत.  महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज आज सकाळी 11 वाजता सुरू झाल आहे.  बहुमत सिद्ध करण्यासाठी शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव आणला जाणार आहे. त्यानंतर या प्रस्तावावर मतदान होईल. मात्र शिंदे सरकार प्रचंड बहुमताने विश्वास संपादन करेल, असा विश्वास भाजपनं व्यक्त केला आहे. आम्ही 166 मतांनी बहुमत सिद्ध करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. 

अधिक वाचा-  Copenhagen shootings : डेन्मार्कच्या शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार, 3 जणांचा मृ्त्यू, अनेकजण जखमी

राहुल नार्वेकर महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष 

भाजपचे आमदार राहुल नार्वेकर महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष झाले. बहुमताने त्यांची निवड झाली. नार्वेकर यांना 164 मते मिळाली. यानंतर नव्या विधानसभाध्यक्षांचे अभिनंदन करण्यासाठी झालेल्या भाषणांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांचे कौतुक केलं. तसंच राहुल नार्वेकर देशातील सर्वात तरुण विधानसभाध्यक्ष असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी