Uday Samant: गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया समोर; म्हणाले, ''त्यांना माझ्या...''

गावगाडा
पूजा विचारे
Updated Aug 03, 2022 | 09:28 IST

Uday Samant Reaction: उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर काल कात्रज चौकात (Katraj Chowk) हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. शिवसैनिकांनी हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

uday-samant
उदय सामंत  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर काल कात्रज चौकात (Katraj Chowk) हल्ला करण्यात आला.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे.
  • स्वतः उदय सामंत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे: Uday Samant Reaction After Attack On His Car: बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झालेले आमदार आणि माजी तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant)  यांच्या गाडीवर काल कात्रज चौकात (Katraj Chowk) हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. शिवसैनिकांनी हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)  यांच्यासह शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान स्वतः उदय सामंत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत काय झालं देखील सांगितलं आहे. घडलेला प्रकार निंदनीय आहे. परमेश्वराचे आणि मतदारसंघातल्या जनतेच्या माझ्यावर असलेल्या आशीर्वादामुळे मी सुखरूप वाचलो, असं उदय सामंत म्हणालेत. 

उदय सामंत यांनी सांगितला घटनाक्रम 

उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, पोलिसांकडे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून तुम्हाला वस्तुस्थिती समजेल. माझ्यापुढे आदित्य ठाकरे यांचा ताफा नव्हता. मी खोटं काहीही सांगणार नाही. जे सांगेन ते पोलिसांना सांगेन.

अधिक वाचा- तिसऱ्या T20 सामन्‍यामध्‍ये भारताचा 7 गडी राखून विजय, सूर्यकुमार चमकला 44 चेंडूत ठोकल्या 76 धावा

पुढे ते म्हणतात की, आम्ही तानाजी सावंत यांच्या घरी जात होतो. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा ताफा पुढे गेला होता. त्यानंतर सिग्नल लागले. मी कोणाचाही ताफा फॉलो करत नव्हतो. सिग्नल लागल्यामुळे मी नियमप्रमाणे थांबलो होतो. यावेळी माझ्या बाजूला दोन गाड्या आल्या. त्यांच्या हातात जे होते, त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. बाजूला 50 ते 60 शिवसैनिक होते. मात्र शिवसैनिकांनी काहीही केलेले नसून फक्त 12 ते 15 लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. 

जो काही प्रकार घडला आहे त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे, असं ही त्यांनी म्हटलं आहे. ज्यांनी हल्ला केला त्यांच्याकडे शस्त्रे कशी आली. त्यांच्या हातात दगड कसे आलं. तसंच त्यांना माझ्या गाडीचा नंबर कसा समजला. याचा तपास केला पाहिजे, असे सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केले आहेत. 

हल्ले करणारे मला शिव्या घालत होते. या घटनेतून मी वाचलो आहे. परमेश्वराचे आणि मतदारसंघातल्या जनतेचे माझ्यावर आशीर्वाद आहेत. मात्र झालेला प्रकार निंदनीय असल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी