Balasaheb Thackeray Shivsena : मुंबई : ज्यांच्याशिवाय भारतीय राजकारण पूर्ण होऊ शकत नाही त्यापैकी एक धुरंदर व्यक्तीमत्त्व म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray). आपल्या निपूण राजकारणासाठी, वक्तृत्वासाठी जसे बाळासाहेब ओळखले जातात तसेच त्यांच्या धक्कातंत्रासाठी हे चांगलेच ओळखले जात. शिवसेना (Shivsena) पक्षातून राजीनामा देण्याचे धक्कातंत्र बाळासाहेबांनीच दिले होते. (shivsena supremo Balasaheb Thackeray left shivsena party twice)
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अनोखे पोट्रेटशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पवईत त्यांचे अनोखे पोट्रेट तयार करण्यात आले आहे. शिवसेना आमदार सुनिल राऊत यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार मातीच्या दिव्यांपासून बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट साकारले आहे. कलाकर चेतन राऊत यांनी साकारलेल्या पोर्ट्रेट मध्ये ६ रंगछटा असलेले दिवे वापरले आहेत. हे पोट्रेट आकारमानाने ४० फूट लांब व ३० फूट रुंद आहे. हे पोर्ट्रेट पूर्ण बनविण्यासाठी ९ तासांचा कालावधी लागला असून चेतन सोबत इतर १५ कलाकार या पोट्रेटच्या निर्मितीत काम करीत होते. हे पोट्रेट २५ तारखेपर्यंत सर्वाना पाहण्यासाठी खुले असणार आहे. #Shivsena #BalasahebThackeray Posted by Times Now Marathi on Saturday, January 22, 2022
१९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली होती. पंरंतु त्यांच्याच कारकीर्दीत त्यांनी दोनदा पक्ष सोडण्याचे जाहीर केले होते. परंतु बाळासाहेब हे शिवसैनिकांसाठी देव झाले होते आणि शिवसैनिक आपल्या देवाला सोडायला तयार नव्हते.
१९७८ आणि १९९२ असे दोन वेळा बाळासाहेबांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. १९७८ साली विधानसभा निवडणूकीत पराभव मिळाल्याने त्याच वर्षी होणार्या मुंबई महानगर पालिकेची निवडणूक बाळासाहेबांनी प्रतिष्ठेची केली. ‘जर या निवडणूकीत शिवसेनेला यश नाही मिळाले तर मी शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देईन’ असे बाळासाहेबांनी जाहीर केले. परंतु आणिबाणीनंतर जनता पक्ष जोमात होता. मुंबईकरांनी शिवसेनेच्या ऐवजी जनता पक्षाला साथ दिली. १९७३ साली शिवसेनेचे पालिका निवडणूकीत ४० नगरसेवक निवडून आले होते. १९७८ साली ही संख्या निम्मी होऊन २१ वर आली. यावर “शिवाजी पार्कातल्या सभेत मुंबई पालिकेवर भगवा फडकवण्यास मी अपयशी ठरलो, लोकांची माझ्यावर निष्ठा राहिली नाही, शब्दाला जागणारा मी माणूस आहे म्हणून मी पक्षाचा राजीनामा देतो” असे म्हणून त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना धक्का दिला. सर्व शिवसैनिकांनी त्यांची मनधरणी केली तेव्हा त्यांनी राजीनामा मागे घेतला.
१९९२ साली जेव्हा राज आणि उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व वाढत होते. तेव्हा ज्येष्ठ शिवसैनिक माधव देशपांडे यांनी बाळासाहेंबांवर घराणेशाहीचा आरोप करत शिवसेनेत कसं कुणालाचा मोठं होऊ देत नाही याचा पाढा वाचला. एक पुस्तिका प्रसिद्ध करून त्यांनी काही नेत्यांचे जंत्रीच सादर केली आणि ‘बाळासाहेब कसे कण्या टाकून कोंबड्या झुंजवत’ असे पुस्तिकेत नमूद केले.
यावर शिवसेनेतल्या नेत्याने आणि शिवसैनिकांनी काहीच प्रतिक्रिया न दिल्याने बाळासाहेबांनाही राग अनावर झाला. दुसर्या दिवशीच १९ जुलै १९९२ रोजी सामनाच्या अग्रलेखाचे शीर्षक होते ‘अखेरचा दंडवत’ आणि आपण या पक्षात राहत नाही असे बाळासाहेबांनी जाहीर केले. या नंतर शिवसेनेचे जत्थेच्या जत्थे मातोश्रीबाहेर जमले आणि बाळासाहेबांची मनधरणी करायला लागले. अखेर बाळासाहेबांनी शिवसैनिकांचे ऐकत आपला निर्णय मागे घेतला.