तर मग पाकिस्तान अस्तित्त्वातच आला  नसताः  उद्धव ठाकरे 

गावगाडा
पूजा विचारे
Updated Sep 18, 2019 | 08:28 IST

उद्धव ठाकरे म्हणाले की, त्याकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर भारताचे पंतप्रधान असते तर पाकिस्तानच अस्तित्त्वातच आला नसता. त्यांनी वीर सावरकरांनी भारतरत्नानं सन्मानित करण्याची मागणी केली आहे.

Uddhav Thackeray
तर मग पाकिस्तान अस्तित्त्वातच आला  नसताः  उद्धव ठाकरे   |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  •  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याची स्तुती केली आहे.
  • सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचं समर्थन देखील केलं आहे.
  • त्याकाळी वीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान अस्तित्त्वातच आला नसता असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुंबईः  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याची स्तुती केली आहे. तसंच सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचं समर्थन देखील केलं आहे. एवंढच काही तर त्याकाळी वीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान अस्तित्त्वातच आला नसता असंही मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ठाकरे यांनी सावरकर यांना भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्याची देखील मागणी केली आहे. सावरकर: इकोज फ्रॉम अ फॉरगाटेन पास्ट या पुरस्तकाच्या प्रकाशनासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या पाकिस्तानबद्दल आपण बोलत आहोत तो पुस्तकाच्या पानांमध्ये कुठेतरी दफन झाला असता जर देशाची सुत्रे वीर सावरकर यांच्या हातात राहिली असती तर.  पुढे ठाकरे म्हणाले की, सावरकर यांना भारतरत्नानं गौरवण्यात आलं आहे. आम्ही (महात्मा) गांधी आणि (पहिले पंतप्रधान जवाहरलाल) नेहरूद्वारे करण्यात आलेल्या काम नाकारत नाही. मात्र देशात दोनपेक्षा जास्त कुटुंबे राजकीय देखावा वर उतरताना दिसली.  शिवसेना आधीपासूनच सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहे.

या पुस्तकात 1883 ते 1924 या काळातील परिस्थितीचा उल्लेख आहे, ज्यात सावरकरांच्या योगदानाचे वर्णन केले आहे. ठाकरे यांनी सांगितलं की, सावरकरांबद्दल कॉंग्रेसनं एकतर्फी मोहीम राबविली होती. ब्रिटिशांविरूद्धच्या लढाईत ते देशाबरोबर नव्हते असा सावरकरांबद्दल प्रचार केला गेला. पण वास्तव पूर्णपणे वेगळं होतं..सावरकर हे १४ वर्षे तुरूंगात होते.  त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आणि म्हणाले की, या पुस्तकाची प्रत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गांधी यांना देण्यात यावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी