धक्कादायक ! साक्री नगरपंचायत निवडणूक निकालानंतर दोन गटात धुमश्चक्री, मारहाणीत एकाचा मृत्यू

Dispute between BJP and Shiv Sena workers in sakri : धुळे साक्री नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. माहितीनुसार निकालानंतर भाजप कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या मोटरसायकलने जात असताना त्यांच्यात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला या वादाचे पर्यावसन काही वेळात हाणामारीत झाले. यात एका महिलेचा मृत्यू झाला.

Shocking! After the Sakri Nagar Panchayat election results, two groups clashed and one died
धक्कादायक ! साक्री नगरपंचायत निवडणूक निकालानंतर दोन गटात धुमश्चक्री, मारहाणीत एकाचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गालबोट
  • भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद
  • दोन गटातील धुमश्चक्रीत महिलाचा मृत्यू

धुळे : राज्यभरातील नगरपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले. त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाला असून या निकालात भाजपने बाजी मारत 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेला 4 जागा व कॉंग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर दोन गटात झालेल्या धुमश्चक्रीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Shocking! After the Sakri Nagar Panchayat election results, two groups clashed and one died)

या घटनेमुळे साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गालबोट लागण्याची चिन्ह पाहायला मिळत आहे. साक्री नगरपंचायतीचे प्रभाग क्रमांक 11 चे शिवसेनेचे उमेदवार ताराबाई जगताप पराभूत झाल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी मध्ये व गोटू जगताप या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी गोटू जगताप याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यात सुरुवात केली. दरम्यान, भावाला वाचविण्यासाठी मोहिनी नितीन जाधव धावून आल्या. 

यात भांडणात त्यांनाही मारहाण झाली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. साक्री शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी