Bollywood News: अमिताभ यांच्या मुलीच्या लग्नाचे फोटो २२ वर्षांनंतर व्हायरल

गावगाडा
Updated Aug 13, 2019 | 16:44 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Bollywood News: भारतात बच्चन कुटुंबावर प्रेम करणारे कोट्यवधी लोक आहेत. अमिताभ यांची कन्या श्वेता नंदा यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.लग्नाच्या २२ वर्षांनंतर हे फोटो पहायला मिळाले.

shweta bachchan rare marriage pictures
श्वेता बच्चन यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • अमिताभ यांच्या कन्या श्वेता यांच्या लग्नाचे फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल
  • लग्नानंतर २२ वर्षांनी पहिल्यांदाच श्वेता यांच्या लग्नाचे फोटो मिळाले पहायला
  • फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी केले श्वेता यांच्या लग्नाचे फोटो शेअर

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशी काही कुटुंब आहेत की, ज्यांच्याविषयी देशभरात उत्सुकता असते. कोण कोणाचे आणि कसे नातेवाईक आहेत? कोणाचं कोणाशी लग्न झालंय किंवा ठरलंय? याविषयी प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यातच अशा एखाद्या कुटुंबातील लग्नाचा फोटो व्हायरल झाला तर मग विचारायलाच नको. भारतात बच्चन कुटुंबावर प्रेम करणारे कोट्यवधी लोक आहेत. अमिताभ यांची लोकप्रियता देशाच्या आणि भाषेच्या सीमा ओलांडून पलिकडे गेली आहे. अमिताभ यांची कन्या श्वेता नंदा यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. श्वेता नंदा या ग्लॅमर जगतापासून तशा दूर असतात. त्यातच त्याचं लग्न होऊन जवळपास २२ वर्षे झाली. त्यामुळं त्यांच्या लग्नाच्या फोटांविषयी खूपच चर्चा पाहायला मिळत आहे.

लग्नाचे फोटो २२ वर्षांनी व्हायरल

अमिताभ आणि जया बच्चन यांना श्वेता आणि अभिषेक ही दोन मुले. श्वेता मोठी. चेहरा आणि उंचीमध्ये अमिताभ यांची छाप असलेल्या श्वेता यांनी अभिनय क्षेत्राची निवड केली नाही. हल्ली त्या एखाद दुसऱ्या टीव्ही अॅड किंवा फोटोशूटमध्ये दिसत असल्या तरी, ते त्यांचे व्यावसायिक करिअर नाही. त्यांनी १९९७मध्ये निखिल नंदा यांच्याशी विवाह केला. त्यानंतर आता जवळपास २२ वर्षांनी त्यांच्या लग्नाचे फोटो पहायला मिळत आहेत. फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी श्वेता यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यासाठी श्वेता किंवा बच्चन कुटुंबाची अनुमती घेतली आहे की नाही, याबाबत अद्याप माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही.

अमिताभ जया बच्चन कन्यादान करताना

फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला आपल्या करिअरचं ३३वं वर्ष सेलिब्रेट करत आहेत. या निमित्ताने त्यांनी श्वेता नंदा यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. बच्चन कुटुंबीयांच्या चाहत्यांनी या फोटोंना पसंती दिली आहे. वधूच्या वेशातील श्वेता यांनी मरून कलरचा वेलवेट लेहंगा घातला असून, त्यात त्या खूपच सुंदर दिसत आहेत. त्यांचा वधूच्या वेशातील फोटो सोशल मीडियावर खूपच शेअर होताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये अमिताभ आणि जया बच्चनही दिसत आहेत. तर एक फोटो अभिषेक आणि श्वेता यांचा आहे. अभिषेक श्वेताला मंडपात घेऊन येतानाचा फोटो आहे. अमिताभ आणि जया यांचा फोटो कन्यादान करतानाचा आहे. श्वेता यांचे पती निखिल नंदा हे रितू नंदा यांचे चिरंजीव आहेत. रितू नंदा या शोमन राज कपूर यांच्या कन्या आहेत. श्वेता आणि निखिल यांना नव्या नावाची मुलगी आणि अगस्त्य नावाचा मुलगा आहे. या विवाहाच्या निमित्ताने कपूर आणि बच्चन कुटुंबीय नातेवाईक झाले. पुढे रणधीर कपूर यांची मोठी मुलगी करिष्मा आणि अभिषेक यांच्या लग्नाचीही चर्चा सुरू होती. पण, काही कारणास्तव हा विवाह होऊ शकला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Bollywood News: अमिताभ यांच्या मुलीच्या लग्नाचे फोटो २२ वर्षांनंतर व्हायरल Description: Bollywood News: भारतात बच्चन कुटुंबावर प्रेम करणारे कोट्यवधी लोक आहेत. अमिताभ यांची कन्या श्वेता नंदा यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.लग्नाच्या २२ वर्षांनंतर हे फोटो पहायला मिळाले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...