सोलापूर : शेअर मार्केटच्या (Stock market) नावाखाली कोट्यवधी रुपये कमवून देण्याचे स्वप्न दाखवून सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अनेकांना विशाल फटे (vishal fate) याने चुना लावला आहे. लोकांचे पैसे घेऊन पोबारा झालेल्या विशालच्या विरोधात बार्शी (barshi) शहर पोलिस ठाण्यात तक्रारींचा पाऊस पडत असून एक दिवसात तब्बल ४० जणांंनी तक्रार नोंदवली. दरम्यान, या प्रकरणी सोशल मिडियावर जोक्स आणि काही पाट्या देखील व्हायरल होऊ लागल्या आहेत. 'फटे'नं फाट्यावर मारलं, उधारी बंद! अशी पाटी एका दुकानदारानं लावली आहे. ही पाटी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Solapur Barshi Froud Case, two arrested for embezzling crores of rupees)
विशाल फटेनं बार्शी आणि सोलापुरातील अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला असून सध्या तो फरार आहे. दीपक आंबरे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात विशाल फटे याने आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद दिली. त्यानंतर बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रारदारांची गर्दी झाली. गुन्हा दाखल होताना 6 तक्रारदारांचे जवळपास 5 कोटी 63 लाखांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र परवा रात्रीपर्य़ंत तक्रारदार वाढल्याने हा आकडा जवळपास 12 कोटींवर पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तसेच गुन्ह्याची व्याप्ती पाहता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सुरुवातीला तपास पोलिस निरीक्षकांकडे होता मात्र आता हा तपास डीवायएसपी दर्जाचे अधिकारी करत आहे. या बाबतीत विशेष तपास पथक देखील नेमलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील अंबादास फटे आणि वैभव फटे यांना पोलिसांनी अटक केली. .
विशाल फटे हा मुळचा मंगळवेढा तालुक्यातील आहे. त्याचे वडील बार्शीतील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून ते बार्शीतच वास्तव्यास होते. बार्शीतील शिवाजी महाविद्यालयासमोर साई नेट कॅफे नावाने तो नेट कॅफे चालवत होता. इथूनच तो छोट्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक देखील करत होता. विशालका कन्सलटन्सी सर्व्हिसेस लि. या कंपनीच्या माध्यमातून तो बार्शी परिसरात काम करीत होता.
विशालने दीपक यांना शेअर मार्केटबद्दल सांगितले. आणि त्यांच्याकडून पहिल्यांदा 70 हजार रुपये घेतले. पहिल्याच महिन्यात 30 हजार रुपये वाढ करुन एक लाख रुपयांचा परतावा विशालने दीपक यांना दिला. यामुळे त्यांचा विश्वास वाढत गेला. दीपक यांनी स्वत: सह नातेवाईकांचे पैसे देखील विशालकडे गुंतवले. जवळपास 5 कोटी रुपयांची गुंतवणूक फिर्यादी दीपक यांनी विशालकडे केली होती. दीपक प्रमाणेच बार्शीतील अनेकांनी विशालकडे पैसे गुंतवलेले होते.
दर नियमितपणे गुंतवणुकदारांना स्कीम सांगून तो प्रलोभन देत होता. डिस्पेक्ट अशाच राज्याची एक ऑफर त्याने गुंतवणुकदारांना दिली. 'एक जानेवारी २०२२ पासून एक नवीन स्कीम सुरू होत आहे. ज्यामध्ये फक्त 40 गुंतवणुकदारांना पर्याय आहे. विशेष म्हणजे ही स्कीम नवीन गुंतवणुकदारांसाठी आहे. या स्कीमनुसार जर 1 जानेवारी 2022 रोजी तुम्ही 10 लाख रुपये जमा केले आणि नंतर 1 वर्ष कोणताही परतावा संदेश नाही तर तुम्हाला 2023 साल ६ हजार टक्के परतावा. 10 लाख वर्षात 6 कोटी रुपये होती' अशी ऑफर दिल्यानंतर अनेक जण भुलले.