Navneet Rana : उद्धव ठाकरेंना नडणाऱ्या नवनीत राणांना भयंकर धमकी

Navneet Rana : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. नवनीत राणा यांना एक अज्ञात पत्र आले आहे.

Some People Left Rajasthan Will Reach Amravati Mp Navneet Rana Gets Anonymous Letter 
उद्धव ठाकरेंना नडणाऱ्या नवनीत राणांना भयंकर धमकी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उद्धव ठाकरेंना नडणाऱ्या नवनीत राणांना भयंकर धमकी
  • नवनीत राणा यांना एक अज्ञात पत्र आले
  • काही जण राजस्थान येथून अमरावतीसाठी निघाले असल्याची माहिती

Navneet Rana : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. नवनीत राणा यांना एक अज्ञात पत्र आले आहे. या पत्रात काही जण राजस्थान येथून अमरावतीसाठी निघाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तुम्ही सतर्क राहा. तुम्हाला काही होऊ नये यासाठी अल्लाकडे दुआ करतो असे पत्रात नमूद आहे. पत्राची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी खासदार नवनीत राणा यांना सतत पुरेसे संरक्षण मिळेल याची खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. 

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर शिंदे गटाचा उमेदवार ठरला?

Eknath Khadse: गिरीश महाजनांनी केली तक्रार, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर खडसे अडचणीत; 'त्या' कारभाराची होणार चौकशी

याआधी राजस्थानमध्ये तसेच महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात गळा चिरून हत्या करण्याच्या समसमान घटना घडल्या. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांचं समर्थ केल्यानं राजस्थानच्या उदयपूरमध्ये टेलर असलेल्या कन्हैयालालची आणि महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यात केमिस्ट असलेल्या उमेश कोल्हेची गळा चिरून हत्या करण्यात आली. या प्रकरणांमध्ये तपास पथकांनी आरोपींना अटक करून जेलमध्ये ठेवले आहे. ही कारवाई झाली असताना नवनीत राणा यांना निनावी पत्र आले आहे. यामुळे पोलीस खबरदारी घेत आहेत.

याआधी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणणार अशी घोषणा नवनीत राणा यांनी केली होती. पण हनुमान चालिसा म्हणण्यासाठी मुंबईत येताच नवनीत राणा यांना पोलिसांनी देशद्रोहाचा आरोप ठेवून अटक केली होती. पुढे यावरून कोर्टात खटलाही झाला. या निमित्ताने चर्चेत आलेल्या नवनीत राणा आता ताज्या निनावी पत्रामुळे चर्चेत आहेत.

नुपुर शर्मा केस

नुपुर शर्मा यांनी भाजपच्या प्रवक्तेपदी असताना पैगंबराविषयी एक वक्तव्य केले होते. एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात (डीबेट शो) हे वक्तव्य करण्यात आले. या घटनेला काही दिवस झाल्यानंतर कार्यक्रमातील विशिष्ट भाग सोशल मीडियावर फिरवून एक वातावरण तयार करण्यात आले. हे प्रकरण शांत झाले असे वाटत असताना नव्या धक्कादायक घटना घडल्या. सोशल मीडियावर नुपुर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या अनेक पोस्ट फिरत होत्या. यापैकी समर्थन करणारी पोस्ट आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करणाऱ्या कन्हैयालालची हत्या झाली. याआधी नुपुर शर्मा यांचे समर्थन करणारा मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या उमेश कोल्हेची हत्या झाली. सध्या नुपुर शर्मा यांना भाजपने प्रवक्तेपदावरून हटविले असून पक्षातून निलंबित केले आहे. पण नुपुर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्यांची जशी हत्या केली तशाच पद्धतीने आणखी हत्या करून कायदा सुव्यवस्थेला आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना आलेल्या निनावी पत्रामुळे या चर्चेने जोर धरला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी