'कधीकधी उपाशी मेलेलं बरं असं वाटतंय', सरकारच्या निर्बंधानंतर मजूर चिंतेत

worried after government restrictions : कोरोना व्हायरसमुळे सर्व पर्यटन स्थळांवर निर्बंध आल्याने पर्यटन उद्योगातून कमाई करणाऱ्या लोकांचे जीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ फोटोग्राफर म्हणून काम करणारा सांगतो की, त्यांनी त्यांच्या व्यवसायात इतकी मंदी कधीच पाहिली नाही. म्हणतो, "लॉकडाऊन नसतानाही गेले दोन आठवडे खूपच वाईट होते. पण तरीही पर्यटकांची संख्या खूपच कमी होती. आता मी माझ्या गावी जाऊन कामही करू शकत नाही. मी त्याचा विचार करत राहतो.

'Sometimes it feels good to starve', workers worried after government restrictions
'कधीकधी उपाशी मेललं बरं असं वाटतंय', सरकारच्या निर्बंधानंतर मजूर चिंतेत  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • कोरोना व्हायरसमुळे सर्व पर्यटन स्थळांवर निर्बंध आल्याने पर्यटन उद्योगातून कमाई करणाऱ्या लोकांचे जीवन विस्कळीत
  • पर्यटन व्यवसायात इतकी मंदी कधीच पाहिली नाही.
  • लॉकडाऊन नसतानाही गेले दोन आठवडे खूपच वाईट होते. पण तरीही पर्यटकांची संख्या खूपच कमी होती.

मुंबई : कोरोनाच्या ओमिक्राॅन या नव्या व्हेरिएन्टचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने गंभीर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी महाराष्ट्र राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या रोज कमावणाऱ्यांची चिंता वाढली आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांनी फुललेला परिसरात रविवारी तुरळक पर्यटक आले होते. या परिसरात फोटोग्राफी करणाऱ्या लोकांच्या जीवनात डोकावून पाहिलं आणि त्यांच्यासाठी येणारा काळ काय घेऊन येणार आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला असता ते चिंतेत असल्याचे आढळून आले. ('Sometimes it feels good to starve', workers worried after government restrictions)

करोनाचा संसर्ग वाढल्याने राज्य सरकारने गर्दी कमी करण्याकरिता निर्बंध काहीसे कठोर केले आहेत. त्यानुसार रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडता येईल. तसेच खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांची दारे अभ्यगतांसाठी बंद करण्यात आली आहेत. मॉल्स, चित्रपट आणि नाटय़गृहे ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. तसेच उपाहारगृहांमध्ये ५० टक्केच प्रवेशाला परवानगी असेल. गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध रविवारी मध्यरात्रीपासून अंमलात येतील. 

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ही ही जागा साधारणपणे खूप गर्दी आणि गोंगाट करणारी असते. पण रविवारी थोडी शांतात होती. त्यामुळे खवळणारा समुद्र आणि त्यांच्या लाटांचा आवाज कानावर पडत होता. लाटांचा आवाज ऐकणे हा एक वेगळा अनुभव होता. पण हे आवाज ऐकायला येत असताना एका कोपऱ्यात लोकांची झुंबड बसलेली दिसली.तिथं असणाऱ्या प्रत्येक व्यवसायिकाच्या चेहऱ्यावर निराशा होती. 

तेव्हा त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र प्रतिक्रिया उमटल्या. तिथे काम करणारा फोटोग्राफर म्हणाला, "मी रोज सहाशे रुपये कमावतो. आणि मला पाच लोकांना खायला द्यावे लागेल, येत्या काही दिवसांत आमची रसद संपेल. मला कोरोना विषाणूचा धोका माहित आहे, पण मी माझ्या मुलांना उपाशी पाहू शकत नाही." 

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून कसे तरी बाहेर पडतोय, तोच ही तिसरी लाट आलीय. “आम्ही आमचा खर्च कसा तरी सांभाळतोय, काय करावं ते कळत नाही. कधीकधी उपाशी मरणे योग्य वाटते."

लॉकडाऊनच्या चर्चेमुळे परप्रांतीय आणि विशेषतः मजूर खूप घाबरले आहेत. गुरुवारी रात्रीपासूनच मुंबईतील लोकमान्य टिळक स्थानकावर परप्रांतीयांची गर्दी जमू लागली. प्रचंड गर्दीमुळे अनेकांना रेल्वेचे तिकीटही मिळाले नाही. असे असतानाही कामगार तेथून हलले नाहीत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर थांबलेल्या परप्रांतीयांना पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या.

सरकारने घातलेल्या निर्बंधानंतर गेट वे ऑफ इंडिया परिसरातील फोटोग्राफरांप्रमाणे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मजूर आणि परप्रांतियांना पुढील उत्पन्नासाठी किमान २१ दिवस वाट पाहावी लागणार आहे. याचा परिणाम असा होईल की अनेक घरांमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू संपतील. त्यांना उसनवारी करावी लागले. 

अशा परिस्थितीत, त्यांचे जीवन आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवन त्याच रोख उत्पन्नावर अवलंबून असते जे ते दिवसभर काम करून घरी घेऊन जातात. यातील अनेक परप्रांतीय आहेत. ते कामासाठी इतरत्र आले आहेत. आता त्यांना पुन्हा तात्पुरत्या स्वरुपाचे नवीन काम शोधावे लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी