Maharashtra SSC Result 2020 (Declared): पाहा Maharashtra Board १०वीचा निकाल @mahresult.nic.in वर

गावगाडा
रोहित गोळे
Updated Jul 29, 2020 | 13:56 IST

Maharashtra SSC Result 2020 (Declared): महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल आज (२९ जुलै) जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आता अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन निकाल पाहता येईल.

ssc result 2020 MSBSHSE
दहावीचा निकाल २०२०  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • दहावीचा अधिकृत निकाल जाहीर
 • बोर्डाने जाहीर केली काल जाहीर केली होती निकालाची तारीख
 • दुपारी १ वाजता जाहीर होणार ऑनलाइन निकाल

Maharashtra SSC Result 2020 (Declared)/पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2020 परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC result 2020) आज (२९ जुलै २०२०) सकाळी ११.१४ वाजता पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आला. यंदा राज्यात दहावीचा निकाल ९५.३०% एवढा लागला आहे. यावर्षी राज्याचा निकाल हा तब्बल १८ टक्क्यांनी वाढला आहे. दहावीचा निकाल हा बोर्डाकडून पत्रकार परिषद (Press confeene start) घेऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, या निकालात नेहमी प्रमाणेच मुलींनी बाजी मारली असून ९६.९१ टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९३.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर एकूण ९३.९० परीक्षार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत.  

Maharashtra SSC Result 2020 - महत्त्वाचे मुद्दे (Highlights)

 • यंदा दहावीच्या परीक्षेला १५,८४,२६४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 
 • यापैकी १५,०१,१०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
 • यंदा राज्यातील एकूण निकाल ९५.३० टक्के इतका लागला आहे.
 • तब्बल ९२.७३ टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
 • पुनर्परीक्षा देणारे ७५.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
 • दरम्यान, ५ लाख ५० हजार ८०९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत (First Class) उत्तीर्ण झाले आहेत. 
 • तर ३ लाख ३० हजार ५८८ विद्यार्थी
 • द्वितीय श्रेणीत (Second Class) उत्तीर्ण झाले आहेत. 
 • तर ८०,३३५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत (Pass Class)पास झाले आहेत 

SSC Result 2020: विभागानुसार निकाल

दहावी २०२० निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. यंदा कोकण विभागाचा निकाल तब्बल ९८.७७ टक्के एवढा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल हा ९२ टक्के एवढा लागला आहे. पाहा हा विभागानुसार निकाल.

 1. कोकण - ९८.७७ टक्के 
 2. पुणे- ९७.३४ टक्के 
 3. कोल्हापूर -९७.६४  टक्के 
 4. अमरावती - ९५.१४ टक्के 
 5. नागपूर - ९३.८४ टक्के 
 6. मुंबई-  ९६.७२ टक्के 
 7. लातूर - ९३.०७टक्के 
 8. नाशिक - ९३.७३ टक्के 
 9. औरंगाबाद -  ९२ टक्के 

आज (२९ जुलै) दुपारी १ वाजता निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. १२वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर आज दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना हायसं वाटलं आहे. 

कसा पाहाल आपला दहावीचा निकाल? 

 1. रिझल्ट पाहण्यासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा
 2. त्यानंतर Maharashtra SSC result 2020 क्लिक करा 
 3. त्यानंतर एक नवीन विंडो आपल्या स्क्रिनवर दिसेल. 
 4. इथे आपला सीट नंबर आणि आईचं नाव टाकून सबमिटवर क्लिक करा. 
 5. यानंतर रिझल्ट आपल्या स्क्रीनवर दिसू लागेल .

२०१९ साली दहावीचा निकाल किती टक्के?

२०१९ साली तब्बल १६,२८,६१३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १४,५६,२०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे मागील वर्षी राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल ७७.१० टक्के एवढा होता. गेल्या वर्षी नेहमीप्रमाणे कोकण विभागाने निकालात बाजी मारली होती. कोकण विभागाचा निकाल तब्बल ८८.३८ टक्के एवढा लागला होता. त्यामुळे यावेळेस देखील कोकण विभागच बाजी मारणार का? याकडेच सगळ्यांचं लक्ष असणार आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी