Maharashtra SSC Result 2020:'MSBSHSE' दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर, इथे पाहा mahresult.nic.in मार्क

गावगाडा
रोहित गोळे
Updated Jul 29, 2020 | 14:41 IST

MSBSHSE SSC Result 2020: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल आज (२९ जुलै) जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे.

MSBSHSE ssc result 2020 online
दहावीचा निकाल २०२० ऑनलाइन जाहीर 

MSBSHSE SSC Result 2020/पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2020 परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC result 2020) अखेर आज (२९ जुलै) जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा ऑनलाइन निकाल दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर दहावीचा निकाल जाहीर केला गेला आहे. १२वीचा निकालानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर आज निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

यंदा दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च दरम्यान घेण्यात आलेली. मात्र कोरोना साथीमुळे २३ मार्चचा शेवटचा पेपर रद्द करण्यात आला होता. या पेपर गुण इतर विषयांच्या गुणांच्या सरासरीनुसार देण्यात येणार आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी जवळजवळ १७ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.  

कसा पाहाल आपला निकाल?

  1. रिझल्ट पाहण्यासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा
  2. त्यानंतर Maharashtra HSC result 2020 क्लिक कर
  3. त्यानंतर एक नवी विंडो सुरु होईल. 
  4. इथे आपला सीट नंबर आणि आईचं नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा. 
  5. त्यानंतर आपल्याला आपले नेमके गुण दिसणार आहेत. 

या वेबसाईटवर पाहू शकाल निकाल

या तीनही वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. 

मोबाईलवरूनही पाहता येणार निकाल

बीएसएनएल मोबाईलचे यूजर्स ५७७६६ या नंबरवर MHSSC<space> <seatno> हा मेसेज पाठवून निकाल पाहू शकतात.

२०१९ साली दहावीचा निकाल किती टक्के?

२०१९ साली तब्बल १६,२८,६१३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १४,५६,२०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे मागील वर्षी राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल ७७.१० टक्के एवढा होता. गेल्या वर्षी नेहमीप्रमाणे कोकण विभागाने निकालात बाजी मारली होती. कोकण विभागाचा निकाल तब्बल ८८.३८ टक्के एवढा लागला होता. त्यामुळे यावेळेस देखील कोकण विभागच बाजी मारणार का? याकडेच सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी