माळशेज घाटात एसटी कंडक्टरची आत्महत्या

ST conductor commits suicide in Malshej Ghat in Murbad : कल्याण - अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात एसटी कंडक्टर (एसटी वाहक) गणपत इडे यांनी आत्महत्या केली.

ST conductor commits suicide in Malshej Ghat in Murbad
माळशेज घाटात एसटी कंडक्टरची आत्महत्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • माळशेज घाटात एसटी कंडक्टरची आत्महत्या
  • एसटी कंडक्टर (एसटी वाहक) गणपत इडे यांनी केली आत्महत्या
  • टोकावडे पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला

ST conductor commits suicide in Malshej Ghat in Murbad : माळशेज घाट : कल्याण - अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात एसटी कंडक्टर (एसटी वाहक) गणपत इडे यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी टोकावडे पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.

एसटी महामंडळाचा वाहननामा, बसचे बदलते रुपडे

एसटी कंडक्टर (एसटी वाहक) गणपत इडे मूळचे भंडारदरा येथील रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंब तिथेच वास्तव्यास आहे. घरातल्यांना माहिती देण्यात आली आहे. गणपत इडे यांचे पार्थिव दरीतून काढून मुरबाड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी (पोस्टमॉर्टेम) पाठविण्यात आले आहे. 

कल्याण ते अकोले ही अकोले एसटी डेपोची बस दुपारी कल्याण येथून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले एसटी डेपोच्या दिशेने निघाली. बस माळशेज घाटातून जात असताना गणपत यांनी अचानक उडी मारली आणि आत्महत्या केली. गणपत इडे यांनी टोकाचे पाऊल उचलण्यामागील कारण अद्याप समजलेले नाही. पोलीस तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी