धक्कादायक !, पगारवाढ रोखल्याने RPFच्या कॉन्स्टेबलने केली सब इन्स्पेक्टरची हत्या

RPF Sub Inspector Murder : कल्याण रेल्वे बॅरेकमध्ये आरपीएफच्या सब इन्स्पेक्टरचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.

Sub Inspector killed by RPF constable in Kalyan
धक्कादायक !, कल्याणमध्ये RPFच्या कॉन्स्टेबलने केली सब इन्स्पेक्टरची हत्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कल्याण आरपीएफ सब इन्स्पेक्टरचा खून
  • कल्याण पूर्व सिद्धार्थ नगर येथील घडला प्रकार
  • लाकडी दांडक्याने मारहाण करत केली हत्या 

ठाणे : कल्याण येथील रेल्वे बॅरेकमध्ये आरपीएफच्या सब इन्स्पेक्टरचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे रेल्वे विभागामध्ये खळबळ उडाली आहे. बसवराज गर्ग असे मृत सब इन्स्पेक्टरचे नाव असून या खूनाप्रकरणी कॉन्स्टेबल पंकज यादव याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. (Sub Inspector killed by RPF constable in Kalyan)

अधिक वाचा : Mohammed Shami: मोहम्मद शमीने केली इतिहासाची पुनरावृत्ती, हा कारनामा करणारा ठरला 9वा भारतीय बॉलर

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी बसवराज गर्ग हे रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.  त्यांच्या कार्यक्षेत्रात रोहाचा परिसर येतो. तर काॅन्स्टेबल पंकज यादव याची पोस्टिंग पेण आरपीएफ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रोहा येथे आहे. एका प्रकरणात पंकज यादव याची चौकशी करत कारवाई केल्याचा पंकजला राग आला होता. पंकज यादवच्या  पगारवाढीची शिफारस करण्यासाठी गर्ग यांच्या परवानगीची आवश्यकता होती. पण बसवराज गर्ग यांनी रोखली होती.

अधिक वाचा : India Post GDS Recruitment 2023: Post मध्ये 40,889 पदांसाठी मोठी भरती; जाणून घ्या अर्ज कसा कराल

याचा राग मनात बुधवारी रात्री पंकज यादवने गर्ग यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. मारहाण इतक्या जोरात करण्यात आली की, सब इन्स्पेक्टरचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यानंतर आरोपी पंकजने घटनास्थळावरून पळ काढला आणि रोहा गाठला. दरम्यान, खूनाची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी तपास करुन संशयित आरोपी पंकज यादव याला अटक केली आहे. पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी