सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी दिलेला निकाल जसाचा तसा 

गावगाडा
Updated Nov 09, 2019 | 16:10 IST

SC Judgement Ayodhya Case: गेले अनेक वर्ष ज्या निकालाकडे संपूर्ण देश डोळे लावून बसलं होतं. त्या अयोध्या प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. जाणून घ्या या प्रकरणातील निकाल जसाचा तसा

supreme court final judgement on ayodhya case latest update
सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी दिलेला निकाल जसाचा तसा   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिला ऐतिहासिक निर्णय
 • 'केंद्र सरकारने ट्रस्ट स्थापन करुन वादग्रस्त जागी मंदिर स्थापन करावं'
 • 'मशिदीसाठी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत अन्यत्र ठिकाणी ५ एकर जागा द्यावी'

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने आज (९ नोव्हेंबर) अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालात सुप्रीम कोर्टाने अनेक तथ्य जाणून घेतली. याचवेळी अलाहबाद कोर्टाने दिलेला त्रिभाजनचा निकाल योग्य नसल्याचंही म्हटलं आहे. यावेळी कोर्टाने मान्य केलं आहे की, वादग्रस्त जागेवर मशिदीच्या खाली एक संरचना होती. तसंच तिथे आधी हिंदू पूजा देखील करत होते असं कोर्टाने मान्य केलं आहे. पाहा सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नेमकं काय म्हटलं आहे. 

सुप्रीम कोर्टाचा निकाल जसाचा तसा: 

'केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली ट्रस्ट स्थापन करून त्या जागी मंदिर बांधण्यात यावं. केंद्र शासनाने मान्य केल्यास निर्मोही अखाडा यांना ट्रस्टमध्ये प्रतिनिधित्व दिलं जाईल. मशिदीसाठी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत अन्यत्र ठिकाणी ५ एकर जमीन दिली जावी.'

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की, 'केंद्र सरकार ३-४ महिन्यांत ट्रस्ट स्थापन करुन मंदिर बांधण्यासाठी वादग्रस्त जागा या ट्रस्टकडे सोपवण्यात यावी. मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने नियमावली तयारी करावी.' असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.  

सुप्रीम कोर्टाच्या निकाल वाचनातील काही महत्त्वाचे मुद्दे:     

 1. अयोध्या निकाल LIVE UPDATE: वादग्रस्त जागेची कोणतीही वाटणी होणार नाही : सुप्रीम कोर्ट
 2. अयोध्या निकाल LIVE UPDATE:  सुन्नी वक्फ बोर्डाकडून सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत
 3. अयोध्या निकाल LIVE UPDATE: वादग्रस्त जागी मंदिर बनविण्यात यावं, मशिदीसाठी अयोध्येत ५ एकर जागा अन्य ठिकाणी देण्यात यावी: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
 4. अयोध्या निकाल LIVE UPDATE:  ट्रस्ट स्थापन करुन मंदिर उभारण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
 5. अयोध्या निकाल LIVE UPDATE: मंदिर बनविण्यासाठी केंद्र सरकारने काही नियम तयार करावेत: सुप्रीम कोर्ट
 6. अयोध्या निकाल LIVE UPDATE:  केंद्र सरकारने ३ महिन्यात सुन्नी बोर्डाला पाच एकर जमिन अन्यत्र द्यावेत: सुप्रीम कोर्ट
 7. अयोध्या निकाल LIVE UPDATE: सुन्नी बोर्डास अन्य ठिकाणी जमीन देणे गरजेचे: सुप्रीम कोर्ट
 8. अयोध्या निकाल LIVE UPDATE:  आस्थेच्या मुद्द्यावर जमिनीचं त्रिभाजन करणं हे अतार्किक : सुप्रीम कोर्ट
 9. अयोध्या निकाल LIVE UPDATE: वादग्रस्त जमिनीचं त्रिभाजन करणं हा अयोग्य निर्णय होतं : सुप्रीम कोर्ट
 10. अयोध्या निकाल LIVE UPDATE: इंग्रजांच्या भूमिकेमुळे हिंदू-मुस्लिम वाद झाला : सुप्रीम कोर्ट
 11. अयोध्या निकाल LIVE UPDATE: वादग्रस्त वास्तू पाडणं हे कायद्याचं उल्लंघन होतं : सुप्रीम कोर्ट
 12. अयोध्या निकाल LIVE UPDATE: इंग्रजांनी हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळ्या जागा दिल्या होत्या : सुप्रीम कोर्ट
 13. अयोध्या निकाल LIVE UPDATE:  १८५६ आधी हिंदू तिथे पूजा करत होते, त्यानंतर इंग्रजांनी एक रेलिंग बनवली होती: सुप्रीम कोर्ट
 14. अयोध्या निकाल LIVE UPDATE:  १२व्या आणि १६व्या शतकाचे पुरावे नाही पण वादग्रस्त जागी हिंदू पूजा करत होते: सुप्रीम कोर्ट
 15. अयोध्या निकाल LIVE UPDATE: चौथरा आणि सीतेची रसोई स्थान सुप्रीम कोर्टाकडून मान्य
 16. अयोध्या निकाल LIVE UPDATE: हिंदूंची आस्था चुकीची याला पुरावे नाहीत, रामलल्लाने ग्रंथांचे दाखले दिले आहेत: सुप्रीम कोर्ट
 17. अयोध्या निकाल LIVE UPDATE: आस्था आणि श्रद्धा याबाबत वाद होऊ शकत नाही. त्यामुळे हा निकाल फक्त वादग्रस्त जागेबाबत आहे.
 18. अयोध्या निकाल LIVE UPDATE: रामाचा जन्म अयोध्येत झाला यात कोणताही वाद नाही
 19. वादग्रस्त वास्तू बांधताना स्तंभ आणि दगड वापरण्यात आले होते: सुप्रीम कोर्ट
 20. रामलल्लाचं कायदेशीर अस्तिव सुप्रीम कोर्टाला मान्य
 21. वादग्रस्त जागा सरकारच्या मालकीची - सुप्रीम कोर्ट
 22. निर्मोही आखाड्याचा दावा देखील फेटाळण्यात आला
 23. ५-० ने सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला आहे, सर्व न्यायाधीशांचं एकमत
 24. पुढील २० मिनिटात निकाल देणार - सरन्यायाधीश
 25. शिया बोर्डाची याचिका फेटाळली आहे.  
 26. बाबरी मशिद रिकाम्या जागी बांधण्यात आली नव्हती, मशिदीच्या खाली एक मोठी रचना होती, पण ती इस्लामिक नव्हतं : सुप्रीम कोर्ट    

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...