Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष

गावगाडा
Pooja Vichare
Updated Nov 01, 2022 | 08:55 IST

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) या संदर्भात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज ही सुनावणी होणार आहे.

Maharashtra Political Crisis
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी, निर्णयाकडे सर्वांचं लक्ष  
थोडं पण कामाचं
  • राज्यात सत्तासंघर्षाची घडना घडली.
  • महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) या संदर्भात सुनावणी होणार आहे.
  • न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज ही सुनावणी होणार आहे.

मुंबई: Maharashtra Political Crisis: गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातल्या (Maharashtra Politics) राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच राज्यात सत्तासंघर्षाची घडना घडली. याचसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे.  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर  आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) या संदर्भात सुनावणी होणार आहे.  न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज ही सुनावणी होणार आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होईल. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या आल्या त्यामुळे ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती.

अधिक वाचा- Solapur Accident : कार्तिकी वारी अखेरची ठरली ... ! दिंडीत चालणाऱ्या 7 वारकऱ्यांना कारने चिरडले

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर निर्णय घेण्यासाठी न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांचा या घटनापीठात समावेश आहे. . त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंदर्भाच्या या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. आजच्या सुनावणीत विचारविनिमय आणि युक्तिवाद होण्याची अपेक्षा आहे.  शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याबाबत निवडणूक आयोगाने जी कारवाई केली त्याचाही उल्लेख आजच्या सुनावणीत होण्याची शक्यता आहे. सध्या निवडणूक आयोगाकडून शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर दोन्ही गटांना नवे पक्षनाव आणि निवडणूक चिन्हवाटप केले आहे. त्यानुसार शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धगधगती मशाल आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले आहे.


 
  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी