Nagpur: उपराजधानीत Swine Flu चा विळखा घट्ट, दोन महिन्यात 20 बळी; धाकधूक वाढली

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 27, 2022 | 09:19 IST

Nagpur Swine Flu Outbreak: जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा (Swine Flu) प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतानाचं चित्र आहे. गेल्या 2 महिन्यांत स्वाईन फ्लूनं 20 जणांचा जीव घेतला आहे.

Swine Flu
नागपुरात स्वाईन फ्लूचा वाढतोय प्रार्दुभाव 
थोडं पण कामाचं
  • जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा (Swine Flu) प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतानाचं चित्र आहे.
  • गेल्या 2 महिन्यांत स्वाईन फ्लूनं 20 जणांचा जीव घेतला आहे.
  • डेथ ऑडिट रिपोर्टमध्ये (Death Audit Report) ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

नागपूर:  Influenza In Nagpur: राज्याची उपराजधानी नागपुरमधून (Nagpur)  एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा (Swine Flu)  प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतानाचं चित्र आहे.  गेल्या 2 महिन्यांत स्वाईन फ्लूनं 20 जणांचा जीव घेतला आहे. आरोग्य विभागाच्या (Health Department) डेथ ऑडिट रिपोर्टमध्ये (Death Audit Report)  ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे 122 रूग्ण असून त्यापैकी 24 रूग्ण (swine flu patient) व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात हळूहळू स्वाईन फ्लूचा विळखा घट्ट होताना दिसत आहे.

20 ऑगस्टपर्यंत नागपूरमध्ये एकूण 154 स्वाईन फ्लू रुग्ण होते. दरम्यान येत्या 30 ऑगस्टला होणाऱ्या मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत त्यातील किती रूग्णांच्या मृत्यूचं कारण स्वाईन फ्लू आहे, याची माहिती समोर येईल. 

अधिक वाचा-  नीरज चोप्राचे दमदार कमबॅक, रचला इतिहास; विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय

स्वाईन फ्लूच्या रूग्णांची आकडेवारी 

नागपुरातील शहरी भागात 1 जानेवारी 2022 ते 25 ऑगस्ट 2022 पर्यंत 191 रूग्ण आढळून आले. त्यानंतर  शहराबाहेरील (नागपूर ग्रामीण आणि जिल्ह्याबाहेरील) 155 असे एकूण 346 रूग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली. त्यातील बहुतेक रूग्णांना गेल्या दोन ते तीन महिन्यात स्वाईन फ्लू झाला आहे. एकूण रुग्णांच्या आकडेवारीनुसार शहरातील 116 आणि ग्रामीणचे 75 असे 191 जण हे बरे झाले आहेत. बरे झालेल्या रूग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. मृत्यू विश्लेषण समितीनुसार, शहरात 6, ग्रामीणला 1 आणि जिल्ह्याबाहेरील 3 असे एकूण 10 जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.

122 रूग्णालयात उपचार सुरू 

नागपूर महापालिका हद्दीतील 58 आणि ग्रामीण भागातील 64 असे एकूण 122 रूग्ण सध्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील 24 रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती 

गुरूवारी जिल्ह्यात 24, ग्रामीणमध्ये 16 असे एकूण 40 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. दिवसभरात शहरात 33, ग्रामीणमध्ये 5 असे एकूण 38 रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण 414 सक्रिय कोरोनाग्रस्तांपैकी 36 रुग्ण विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 378 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी