भयंकर अपघात! Maruti alto कार कोसळली 700 फूट खोल दरीत, 2 जण गंभीर तर 5 जण किरकोळ जखमी

Satara Car Accident : सातारा-कास रस्त्यावर भरधाव कारच्या (ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

Terrible accident! Maruti alto car falls into 700 feet deep gorge, 2 seriously injured and 5 minor injured
भयंकर अपघात! Maruti alto कार कोसळली 700 फूट खोल दरीत, 2 जण गंभीर तर 5 जण किरकोळ जखमी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कासवरून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर कारचा अपघात
  • अल्टो कार चालकाचा ताबा सुटल्याने ७०० फुट खोल दरीत कोसळली
  • या गाडीमधील सात जखमी

सातारा :  वर्ल्ड हेरिटेज कास या पर्यटनस्थळावरुन साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या अल्टो कारच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार थेट यवतेश्वर घाटातील ७०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात गाडीमधील सात जण जखमी झाले आहेत.

अधिक वाचा : सायकलीवरुन फिरणारा स्वाभिमानी नेत्याला शेतकऱ्यांनी दिल स्पेशल गिफ्ट, शरद मरकड आता फिरणार इनोव्हा कारमधून

कास रोडवर जाणाऱ्या प्रवाशांनी अपघातातील जखमींना मदत करत बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. संततधार पाऊस आणि खोल दरी यामुळे अपघातग्रस्तांना वर काढण्यास अडचणी येत होत्या. घटनास्थळी पोहोचून पोलीस आणि शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्स टीमने सातही जणांना जखमी अवस्थेतून बाहेर काढले.

यामधील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्वांना साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सर्वांना साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील सर्व जखमी सातारा शहरातील आहेत असं सांगण्यात आलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी