कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है; राज्यसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

Rajyasabha Election Results : राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी अत्युंत चुरशीची लढत झाली, यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

That's not fair; Statement of Supriya Sule after Rajya Sabha result
कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है; राज्यसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रिया सुळे यांनी जबरदस्त डायलॉगबाजी
  • महाविकास आघाडी सरकारची तुलना त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी केली.
  • अपक्ष आमदारांची मतं महाविकास आघाडीला का मिळाली नाहीत, यावर चर्चा करणार

पुणे : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने तीन व भाजपने तीन जागांवर विजय मिळवला आहे. सहाव्या जागेसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत भाजपावर आरोप केले आहेत. (That's not fair; Statement of Supriya Sule after Rajya Sabha result)

अधिक वाचा :

कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक जाहीर

राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती. अखेर राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल हाती लागला. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक होत आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अरे व्वा . दॅट्स नाॅट फेअर. हे यश म्हणजे टीम एफ्टर्ट आहेत. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी काहीच केले नाही का?,असा सवाल सुळे यांन केला.

अधिक वाचा :

Praful Patel : निश्चित झालेल्या कोट्याप्रमाणेच मतदान, राज्यसभा निवडणुकीत विजयानंतर प्रफुल पटेल यांचे विधान

सुप्रिया सुळे म्हणाल्या,  आमच्या पक्षाचे नेते ५५ वर्षे राजकारणात आहे. त्यात काही वर्षे सत्तेत तर काही वर्षे विरोधात बसण्यामध्ये गेली आहेत. हे इलेक्शन आहे, यात आपण काही वेळा जिंकतो काही वेळा हरतो. एकादा अपयश येत तेव्हा लोकांना असे वाटते की, यांची स्ट्रॅटेजी चुकली. कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है, असा विश्वास सुळे सुळे यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा :

Sanjay Raut : दगा देणार्‍यांची यादी आमच्याकडे, संजय राऊत यांची राज्यसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया

शरद पवार म्हणालेत की आम्ही रिस्क घेतली होती. परंतु त्यात यशस्वी झालो नाही. महाविकास आघाडीची मते इनटॅक्ट राहिली आहेत. मात्र जे अपक्ष आमच्यासोबत नव्हते, ते आमच्यासोबत आले नाहीत. राष्ट्रवादीशी संबंधित आमदार संजय शिंदे यांचे मत मिळाले नाही, याबाबत आम्ही बसून चर्चा करणार आहोत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. या निवडणुकीत ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का, हा देखील प्रश्न असल्याचं सुळे म्हणाल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी