Sanjay Raut: ''17 तारखेच्या महामोर्चाला परवानगी द्यावीच लागेल'', संजय राऊतांचा इशारा

गावगाडा
Pooja Vichare
Updated Dec 15, 2022 | 16:34 IST

Sanjay Raut: महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Sanjay Raut
संजय राऊतांचा इशारा 
थोडं पण कामाचं
  • महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
  • 17 तारखेला होणाऱ्या या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
  • यावरुन संजय राऊत यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

मुंबई: Sanjay Raut: महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. 

अधिक वाचा-  Christmas Day 2022 : 'ख्रिसमस'साठी घरच्या घरी तयार करा 'एगलेस केक'

17 तारखेला होणाऱ्या या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन संजय राऊत यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. या देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्राही एकाप्रकारे मोर्चा आहे. त्यामुळे 17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही मोर्चा काढू नये असे वाटत होते तर राज्यपालांना हटवयाल पाहिजे होते. आमच्या देवतांचा अपमान संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती करत आहेत त्याचे समर्थन सरकार करते, त्याविरोधात आम्ही मोर्चा काढायचा नाही का, असा सवाल संजय राऊत यांनी सरकारला विचारला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी