मुख्यमंत्र्यांचे मातोश्रीवर MP सोबत डिनर, तर गडकरींच्या वाड्यावर उपमुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांचा पाहुणचार

Ajit Pawar meet Nitin Gadkari in Nagpur : राज्यातील राजकारण तापले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

The Chief Minister had dinner in Mumbai and the Deputy Chief Minister met Gadkari in Nagpur
मुख्यमंत्र्यांचे मातोश्रीवर MP सोबत डिनर, तर गडकरींच्या वाड्यावर उपमुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांचा पाहुणचार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अजित पवार यांनी आज अचानकच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली
  • अजितदादांसह दिलीप वळसे पाटील व अनिल देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव देशमुख उपस्थित होते.
  • नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा रंगली.

मुंबई : राज्यात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच मनसे-भाजप युतीची चर्चा सुरू आहे. अशा मुंबईत मातोश्रीवर शिवसेना खासदारांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. तत्पूर्वी नागपूरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या वाड्यावर भेट घेतली. या भेटींमुळे राज्यात उलटसुटल चर्चांना उधाण आले आहे. 

अधिक वाचा : 

Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात ९७९ कोरोना Active, आज १४८ रुग्ण, २ मृत्यू

राज ठाकरे यांच्या मशिदींवर भोंगे हटविण्याच्या मागणीमुळे महाविकास आघाडी विरुध्द मनसे आणि भाजप असा संघर्ष सुरु आहेत. त्यात मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा रंगत आहे. अशा परिस्थितीत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी  ‘तेव्हा राष्ट्रवादीसोबत युती न करून चूक केली, त्याचे प्रायश्चित्त अजून भोगतोय’, असे वक्तव्य करुन नवीनच बाॅंम्ब टाकला आहे.

अधिक वाचा : 

नेत्यांनीचं मोडले कायदे; चंद्रकांत पाटील, गृहमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई, अजित पवारांनी भरला 27000 रुपयांचा दंड

अशा परिस्थितीमध्ये नागपुरात सिव्हिल लाइन्स येथील पोलिस भवनाचे उद्घाटन कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमास भाजप नेत्यांनी दांडी मारली. दरम्यान, कार्यक्रम संपल्यानंतर दोन्ही नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या वाड्या जाऊन भेट घेतली. यावेळी नेत्यांमध्ये ४५ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. 

अधिक वाचा : 

KALYAN | काय वेळ आली आहे, सीसीटीव्हीत चप्पल चोर कैद, शहाड परिसरात चप्पल चोरट्याचा धुमाकूळ

भेटीनंतर अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकार दरवर्षी राज्यांना देत असलेल्या केंद्रीय रस्ते निधीबाबत चर्चा करण्यासाठी मी गडकरींची भेट घेतली. “गेल्या वर्षी महाराष्ट्राला 1200 कोटी रुपये CRF मिळाले होते आणि MVA आमदारांनी 600 कोटी रुपयांची कामे सुचवावीत आणि भाजपच्या आमदारांनी उर्वरित 600 कोटींची कामे सुचवावीत, असे गडकरींनी सांगितले होते,” तीच योजना यावर्षीही लागू करता येईल का, हे पाहण्यासाठी आम्ही आलोय. आम्ही रोड ओव्हर ब्रीज आणि अंडर ब्रिजसाठी निधी देण्याबाबतही चर्चा केली आहे,” असे उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी