CM Eknath Shinde : पंढरपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पंढरपूर दौऱ्यावर आषाढी वारी सोहळ्यासाठी येत असतानाच राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अचानकपणे जाहीर झाला. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. अनेक वर्षांपासून विठूरायाची शासकीय महापूजा ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. यावर्षी देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी (१० जुलै) पहाटे होणार आहे. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या परवानगीबाबत जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. ही निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपूर दौऱ्यावर येता येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक वाचा : अवघ्या 5 दिवसांत मुंबईत ४३ टक्के पाऊस, मुसळधार पावसाचा इशारा
जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्राला जर राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पंढरपूर येथे पोहोचतील. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपुरातील शासकीय विश्रामगृह इथे आयोजित 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' या कार्यक्रमाचा समारोप सोहळा होणार आहे. सकाळी अकरा वाजता सुंदर माझे कार्यालय, स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास उपस्थिती लावणार आहेत. एकादशी दिवशी पहाटे शासकीय महापूजा झाल्यावर पहाटे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. पंढरपुरातील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री रविवारी दुपारी तीन वाजता सोलापूर विमानतळाकडे रवाना होणार असून, तेथून शासकीय विमानाने ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई विमानतळ येथे पोहोचतील.
अधिक वाचा ; फक्त 4 क्लिकमध्ये मिळणार पर्सनल लोन, पीएनबीची सुविधा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासकीय महापूजा करणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र काही वर्षांपूर्वी कार्तिकी यात्रेला अशीच आचारसंहिता असताना तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांना शासकीय महापूजेला परवानगी दिली होती. त्यामुळे निवडणूक आयोग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परवानगी देईल अशी शक्यता आहे. परंतु आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक अयोग्य नेमक्या कोणत्या कार्यक्रमाला परवानगी देणार यावर मुख्यमंत्र्यांचा दौरा अवलंबून राहणार आहे.
अधिक वाचा ; भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात १३ हजार कोटींच्या घरात