'Pushpa the Rise' ने उदयनराजेंना पाडली भुरळ, अल्लू अर्जुनच्या एक्टिंगचे झाले फॅन

UdayanRaje Bhosale Watch Pushpa Movie in Satara : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' सिनेमा रिलीज होण्यापूर्वीपासून प्रेक्षकांमध्ये सिनेमाची मोठी क्रेझ होती. रिलिज झाल्यापासून तर सोशल मीडिया असो की मीडिया, सर्वत्र या चित्रपटाची चर्चा होत आहे. साताऱ्याचे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले मित्रांसमवेत जाऊन पुष्पा हा चित्रपट पाहिला.

The craze of 'Pushpa the Rise' in Udayan Raje also became a fan with the acting of Allu Arjun
'Pushpa the Rise' ची उदयनराजेंमध्येही क्रेझ, अल्लू अर्जुनच्या एक्टिंगने झाले फॅन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 'पुष्पा द राइज' रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन
  • स्टार्समध्येही या चित्रपटाची मोठी क्रेझ आहे
  • उदयनराजे भोसले यांनी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिला.

UdayanRaje Bhosale love Pushpa Movie । सातारा : अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा द राइज' रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करत आहेत. कोरोना विषाणूमुळे वाढती निर्बंधांतही चित्रपट अजूनही जोरदार सुरू आहे आणि सत्र कोटीचा टप्पा ओलांडला आहे.  (The craze of 'Pushpa the Rise' in Udayan Raje also became a fan with the acting of Allu Arjun)

पुष्पाच्या हिंदी रिलीजला टक्कर देण्यासाठी अनेक मोठे चित्रपट समोर होते, पण या चित्रपटाने सर्वांना धूळ चारली. प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक आहेत तसेच स्टार्समध्येही या चित्रपटाची मोठी क्रेझ आहे. त्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले कसे मागे राहतील. गुरुवारी उदयनराजे यांनी आपल्या समर्थकांसह साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिला.

Also Read : पूजा गुप्ता यांच्या डोक्यावर थुंकला जावेद हबीब

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' सिनेमा रिलीज होण्यापूर्वीपासून प्रेक्षकांमध्ये सिनेमाची मोठी क्रेझ होती. रिलिज झाल्यापासून तर सोशल मीडिया असो की मीडिया, सर्वत्र या चित्रपटाची चर्चा होत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुकता आहे.  तसेच स्टार्समध्येही या चित्रपटाची मोठी क्रेझ आहे. सोशल मीडियावर अनेक स्टार्स आपल्या भावना उघडपणे व्यक्त करत आहेत. या चित्रपटातील 'ओ अंतवा' या गाण्यात सामंथाचा बोल्ड अवतार दाखवण्यात आला आहे, जो चाहत्यांना खूप आवडतो. चाहत्यांच्या या प्रतिक्रिया बघून समंथा खूपच उत्साहित आहे.

साताऱ्याचे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले मित्रांसमवेत जाऊन पुष्पा हा चित्रपट पाहिला. हा सिनेमा उदनराजेंना आवडला. उदयनराजेंचा साताऱ्यातील थिएटरमधील एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्यांनी चित्रपटाचा आणि चित्रपटाच्या निर्मितीसाठी कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. त्यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदनही केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी