Raksha Bandhan: उदंड झाल्या सुट्ट्या..! मुंबईतल्या शाळांमध्ये रक्षाबंधनाची सुट्टी रद्द; विद्यार्थ्यांचा हिरमोड

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 10, 2022 | 13:31 IST

Raksha Bandhan 2022: उद्या रक्षाबंधन आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे पूर्ण दिवस या सणाचा आनंद विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना घेता येणार नाही आहे.

Raksha Bandhan Holiday
शाळांची सुट्टी रद्द 
थोडं पण कामाचं
  • मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं सुट्टी रद्द केल्याचं पत्र सर्व शाळांना पाठवलं आहे.
  • मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागाचे अधिकारी राजेश कंकाळ यांनी 4 ऑगस्ट रोजी याबाबतचे पत्रक जाहीर केलं.
  • सुट्टी रद्द केल्यानं शिक्षक, विद्यार्थी आणि सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे.

मुंबई: Raksha Bandhan Holiday Canceled: उद्या रक्षाबंधन आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे पूर्ण दिवस या सणाचा आनंद विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना घेता येणार नाही आहे. कारण मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने रक्षाबंधनाच्या सणाची सुट्टी रद्द केली आहे.  मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील मनपा, खासगी आणि विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची रक्षाबंधन सणाची (Raksha Bandhan Holiday) सुट्टी रद्द केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं सुट्टी रद्द केल्याचं पत्र सर्व शाळांना पाठवलं आहे. मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागाचे अधिकारी राजेश कंकाळ यांनी 4 ऑगस्ट रोजी याबाबतचे पत्रक जाहीर केलं. सुट्टी रद्द केल्यानं शिक्षक, विद्यार्थी आणि सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे.

जास्त सुट्ट्यांचं दिलं कारण

राजेश कंकाळ यांनी जारी केलेल्या पत्रात सुट्ट्यांची संख्या जास्त होते हे कारण दिलं आहे. या कारणानेच दरवर्षी दिली जाणारी रक्षाबंधनाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. 

अधिक वाचा- पुणे हादरलं,भरदिवसा अपहरण करून 7 वर्षांच्या मुलीवर लैंगिक शोषणाचा प्रयत्न

सुभाष मोरे यांचा इशारा 

बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळेत बोलावून शिक्षण विभाग मराठी सणांना विरोध करत आहे का, असा प्रश्न  शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी उपस्थित केला आहे. तसंच रक्षाबंधनची सुट्टी रद्द करण्याचे परिपत्रक तातडीनं रद्द करावं आणि सुट्टी जाहीर करावी, अन्यथा शिक्षणाधिकारी कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा सुभाष मोरे यांनी दिला आहे.

पुढे सुभाष मोरे म्हणाले की, वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व शिक्षक संघटनांशी चर्चा करून 76 सुट्ट्या कोणत्या दिल्या जाव्यात याबद्दल ठरवण्यात येते. त्यानुसार या सुट्ट्या ठरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या सुट्ट्यांमध्ये बदल करणं शक्य नसल्याचंही ते बोलले.

कधी आहे रक्षाबंधन? 

श्रावण पोर्णिमा 11 ऑगस्ट 2022 ला सकाळी 10 वाजून 38 मिनिटांनी सुरू होईल आणि पुढील दिवशी 12 ऑगस्ट 2022 ला सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी संपेल. 11 ऑगस्टला भद्रा काल दिवसभर राहील. भद्राची समाप्ती रात्री 8.51 ला होईल. अशातच काही जण 12 ऑगस्टला राखीपोर्णिमा साजरी करू शकतात.  रक्षाबंधन 11 ऑगस्ट 2022 ला जे रक्षाबंधन साजरे करत आहेत ते प्रदोष काल रात्री 8.52 मिनिटे ते रात्री 9.20 मिनिटांपर्यंत राखी बांधू शकतात. या दिवशी राखी बांधण्यासाठी हा सगळ्यात उत्तम मुहूर्त आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी